TRENDING:

फिल्ममध्ये दिले भरभरून इंटिमेट सीन, हिरोईनच्या बहिणीला बसला धक्का, टेन्शनने झाली अशी अवस्था!

Last Updated:
तृप्ती डिमरीने 'लैला मजनू' आणि 'बुलबुल'मधील अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. 'धडक 2'मध्ये ती सिद्धांत चतुर्वेदीसोबत दिसणार आहे.
advertisement
1/8
फिल्ममध्ये दिले भरभरून इंटिमेट सीन,हिरोईनच्या बहिणीचं वाढलं टेंशन,नक्की काय झालं
मुंबई: मोजक्याच चित्रपटांमध्ये काम करूनही आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण करणारी अभिनेत्री तृप्ती डिमरी सध्या यशाच्या शिखरावर आहे. 'बुलबुल' आणि 'लैला मजनू'मध्ये दिसलेली तृप्ती, रणबीर कपूरसोबतच्या 'ॲनिमल' चित्रपटातील छोट्या भूमिकेतून प्रचंड लोकप्रिय झाली.
advertisement
2/8
'ॲनिमल'मधील तिच्या भूमिकेबद्दल आणि त्यातील इंटीमेट सीनबद्दल जेव्हा तिला प्रश्न विचारले गेले, तेव्हा तिचा अनुभव खूपच वेगळा होता. विशेष म्हणजे, या सगळ्याचा तिच्या बहिणीवर काय परिणाम झाला, हे तिने नुकतंच उघड केलं आहे.
advertisement
3/8
तृप्ती डिमरीचे चाहते आणि पाठीराख्यांमध्ये तिची सख्खी बहीणही आहे. 'ॲनिमल' चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर लोकांनी केलेल्या कमेंट्स वाचून तिची बहीण प्रचंड तणावात आली होती! चित्रपटात रणबीर कपूरसोबत तृप्ती डिमरीने दिलेले इंटीमेट सीन, कोणत्याही न्यूकमरसाठी एका मोठ्या आव्हानापेक्षा कमी नव्हते.
advertisement
4/8
तृप्ती डिमरीने 'टू फिल्मी' या यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं, "भरपूर वाईट कमेंट्स आल्यानंतर मी त्या वाचणं बंद केलं होतं. पण माझी बहीण मात्र रात्री उशिरापर्यंत प्रत्येक कमेंट वाचत बसायची आणि मग टेन्शनमध्ये यायची. तिला हे लक्षात आलं की, याचा शेवटी परिणाम होणारच आहे. ती मला म्हणाली, 'तू कितीही चांगलं काम कर, लोक बोलणारच. तुला ज्यात विश्वास आहे, तेच तू करत रहा.'"
advertisement
5/8
तृप्ती डिमरीच्या बहिणीने तिला नेहमीच प्रेरणा दिली. ती तिला म्हणाली होती की, "हे आयुष्य तुझं आहे, तुला ते एकदाच जगण्याची संधी मिळते. चुकांमधून शिकत पुढे जात रहा." बहिणीच्या या सल्ल्याने तृप्तीचं मनोबल वाढलं. तृप्ती तिला आपली एक चांगली मैत्रीण मानते.
advertisement
6/8
आपल्या जुन्या दिवसांची आठवण करून देताना तृप्ती डिमरी म्हणाली, "मला नेहमीच चांगल्या मित्रांची साथ मिळाली. माझी बहीण नेहमीच माझ्या पाठीशी उभी राहिली. जेव्हा माझं ऑडिशन क्लिअर होत नसे, तेव्हा मी तिला रडत फोन करायचे. ती मला म्हणायची, 'तू हे करत रहा. लोकांचं, नातेवाईकांचं किंवा आजूबाजूच्या लोकांचं काही ऐकू नकोस. फक्त करत रहा आणि बघ, ते तुझ्यासाठी काम करतंय की नाही. आणि जर तू आनंदी नसशील, तरच तू मागे फिरण्याचा विचार कर.'"
advertisement
7/8
तृप्ती डिमरी आता तिच्या पुढच्या चित्रपट 'धडक 2' च्या प्रदर्शनाची वाट पाहत आहे, ज्यात ती सिद्धांत चतुर्वेदी सोबत दिसणार आहे. हा रोमँटिक ड्रामा १ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होईल. हा चित्रपट २०१८ च्या 'धडक'चा सिक्वेल असून २०१८ च्या तमिळ चित्रपट 'परियेरुम पेरुमल'चा रिमेक आहे.
advertisement
8/8
तृप्ती डिमरीने २०१८ मध्ये 'लैला मजनू' चित्रपटातून पदार्पण केलं, पण तिला खरी ओळख 'बुलबुल'मधील तिच्या अभिनयामुळे मिळाली, ज्यासाठी तिला फिल्मफेअर ओटीटी अवॉर्डही मिळाला. ३१ वर्षीय तृप्ती डिमरीने 'बॅड न्यूज' आणि 'भूल भुलैया 3' सारख्या चित्रपटांमध्येही काम केलं आहे. २०२१ मध्ये तिला फोर्ब्स इंडियाच्या '३० अंडर ३०' मध्ये स्थान मिळालं होतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
फिल्ममध्ये दिले भरभरून इंटिमेट सीन, हिरोईनच्या बहिणीला बसला धक्का, टेन्शनने झाली अशी अवस्था!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल