'उदे गं अंबे उदे' मालिकेतील अभिनेत्री लग्नबंधनात! नवरा आहे ठाण्यातील बडा उद्योजक, PHOTO
- Published by:Minal Gurav
Last Updated:
उदे गं अंबे उदे या मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्रीनं नुकतंच लग्न. तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
advertisement
1/9

मराठी कलाविश्वात सध्या लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. ईशा डे, रुमानी खरे यांनी काही दिवसांआधीच लग्न केलं. त्यांच्या लग्नाची खूप चर्चा झाली.
advertisement
2/9
त्याचबरोबर आई कुठे काय करते फेम अभिनेत्री अपूर्वा गोरे, रेवती लेले यांच्यानंतर आता आणखी एका लोकप्रिय अभिनेत्रीने आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे.
advertisement
3/9
स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका 'उदे गं अंबे' फेम अभिनेत्री मयुरी कापडणे ही नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. शुक्रवारी 27 मार्च रोजी मयुरीने स्वप्निल मराठेबरोबर लग्नगाठ बांधली.
advertisement
4/9
कुटुंबीय आणि जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला. त्यांच्या लग्नाचे सुंदर फोटो सोशल मीडियावर समोर आले असून सध्या ते जोरदार व्हायरल होत आहेत.
advertisement
5/9
लग्नासाठी मयुरीने खास डिझायनर लेहेंगा परिधान केला होता. पारंपरिक आणि मॉडर्न लूकचा सुंदर मिलाफ तिच्या पेहरावात पाहायला मिळाला. तर स्वप्नील मराठे यांनीही तिला ट्विनिंग करत स्टायलिश सूट घातला होता.
advertisement
6/9
मयुरी ही मुळची पुण्याची आहे. मयुरी लग्नानंतर आता ठाण्याची सून झाली आहे. मयुरीचा नवरा स्वप्नील मराठे हा ठाण्यातील एक युवा उद्योजक म्हणून ओळखला जातो.
advertisement
7/9
'युवान ग्रुप'चा तो प्रमुख असून रिअल इस्टेट, चित्रपट निर्मिती आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय आहेत. त्याने नुकतीच 'कडीपत्ता' या मराठी चित्रपटाची निर्मिती केली होती. त्यामुळे व्यवसायाबरोबरच कला आणि समाजकारण यामध्येही त्याचा सक्रिय सहभाग आहे.
advertisement
8/9
अभिनेत्री मयुरी कापडणे गेली अनेक वर्ष मराठी मालिका विश्वात काम करतेय. ती आजवर अनेक मराठी तसंच हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे.
advertisement
9/9
मयुरीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झाल्यास तिने आतापर्यंत 'जाऊ नको दूर बाबा' या मालिकेत काम केलं आहे. 'तेरी लाडली मैं' या हिंदी मालिकेतही तिनं काम केलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'उदे गं अंबे उदे' मालिकेतील अभिनेत्री लग्नबंधनात! नवरा आहे ठाण्यातील बडा उद्योजक, PHOTO