हिरोईनने हिरोची बनियान घालून दिला बोल्ड सीन, सुपरहिट झाली फिल्म, 30 वर्षांनी पुन्हा रिलीज होतेय कल्ट क्लासिक
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Bollywood Romantic Thriller : ९० च्या दशकातील ज्या रोमँटिक म्युझिकल थ्रिलर सिनेमाने आपल्या बोल्ड सीन्स आणि सुपरहिट गाण्यांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता, तो चित्रपट तब्बल ३० वर्षांनंतर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
advertisement
1/8

मुंबई: ९० च्या दशकातील ज्या रोमँटिक म्युझिकल थ्रिलर सिनेमाने आपल्या बोल्ड सीन्स आणि सुपरहिट गाण्यांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता, तो चित्रपट तब्बल ३० वर्षांनंतर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
advertisement
2/8
राम गोपाल वर्मा दिग्दर्शित 'रंगीला' चित्रपट पुन्हा प्रदर्शित होणार आहे. या निमित्ताने, या चित्रपटातील मुख्य जोडी उर्मिला मातोंडकर आणि जॅकी श्रॉफ यांच्या एका कल्ट आणि बोल्ड सीनमागची कहाणी समोर आली आहे.
advertisement
3/8
१९९५ मध्ये प्रदर्शित झालेला 'रंगीला' हा चित्रपट उर्मिला मातोंडकर आणि जॅकी श्रॉफ यांच्या करियरमधील टर्निंग पॉईंट ठरला. उर्मिलाने तिच्यापेक्षा १७ वर्षांनी मोठ्या असलेल्या जॅकी श्रॉफ यांच्यासोबत बोल्ड सीन्स दिले होते. पण चित्रपटातील सर्वात जास्त गाजलेला सीन होता, तो 'तन्हा तन्हा' या गाण्यातील.
advertisement
4/8
या गाण्यात एका सीनमध्ये उर्मिलाने जॅकी श्रॉफ यांचं टी-शर्ट घालून कॅमेऱ्यासमोर एक दिलखेचक आणि बिनधास्त पोझ दिली होती. त्यावेळी हा सीन अत्यंत बोल्ड मानला गेला होता आणि त्याने खूप सनसनाटी निर्माण केली होती.
advertisement
5/8
या सीनबद्दल सांगताना उर्मिलाने 'झी कॉमेडी शो'मध्ये खुलासा केला होता, "कोणालाच माहिती नाही, पण मी 'तन्हा तन्हा' गाण्यासाठी जॅकी श्रॉफ यांचीच बनियान घातली होती आणि खरं सांगायचं तर ते खूप मजेशीर होते."
advertisement
6/8
उर्मिलाने पुढे सांगितले, "आम्हाला 'तन्हा तन्हा' गाण्यासाठी काहीतरी नवीन करायचे होते, पण त्यासाठी तयार केलेला ड्रेस मला थोडा विचित्र वाटला. पण जॅकी यांनी मला थेट त्यांचा टी-शर्ट घालण्यास सांगितले. मी थोडी गोंधळले, पण नंतर मी देवावर विश्वास ठेवून हात पुढे केला."
advertisement
7/8
चित्रपटाचे दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी गेल्या वर्षी 'फिल्म कंपेनियन'ला सांगितले होते की, "मी त्या सीनसाठी तयार केलेला ड्रेस नाकारला. तेव्हा जॅकीने सांगितले, 'अरे, माझा टी-शर्ट घालायला सांग ना भिड़ू', आणि त्यांनी आपला टी-शर्ट काढून उर्मिलाला दिला होता." म्हणजेच, या आयडियाचे श्रेय जॅकी श्रॉफ यांना जाते.
advertisement
8/8
आमिर खान, उर्मिला मातोंडकर आणि जॅकी श्रॉफ यांच्या दमदार अभिनयाने गाजलेला 'रंगीला' हा चित्रपट ३० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने 4K फॉरमॅटमध्ये पुन्हा प्रदर्शित होत आहे. हा कल्ट क्लासिक चित्रपट २८ नोव्हेंबर रोजी पुन्हा एकदा सिनेमागृहात दाखल होणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
हिरोईनने हिरोची बनियान घालून दिला बोल्ड सीन, सुपरहिट झाली फिल्म, 30 वर्षांनी पुन्हा रिलीज होतेय कल्ट क्लासिक