TRENDING:

ज्याने पालकांसारखं सांभाळलं, त्यानेच दिला धोका? वडापाव गर्लचे नवऱ्यावर चीटिंगचे आरोप, कोण आहे युगम गेरा?

Last Updated:
Chandrika Dixit Husband: दिल्लीच्या रस्त्यावर वडापाव विकताना ग्राहकांशी हुज्जत घालणारी आणि तिथून थेट 'बिग बॉस ओटीटी ३' च्या घरापर्यंत पोहोचलेल्या चंद्रिका दीक्षितने पुन्हा एकदा सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
advertisement
1/9
वडापाव गर्लचे नवऱ्यावर चीटिंगचे आरोप, कोण आहे युगम गेरा?
ओटीटी </a>३' च्या घरापर्यंत पोहोचलेली चंद्रिका दीक्षितने पुन्हा एकदा सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. पण यावेळी हे वादाचं कारण वडापाव नसून तिचं खाजगी आयुष्य आहे." width="750" height="1000" /> दिल्लीच्या रस्त्यावर वडापाव विकताना ग्राहकांशी हुज्जत घालणारी आणि तिथून थेट 'बिग बॉस ओटीटी ३' च्या घरापर्यंत पोहोचलेली चंद्रिका दीक्षितने पुन्हा एकदा सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. पण यावेळी हे वादाचं कारण वडापाव नसून तिचं खाजगी आयुष्य आहे.
advertisement
2/9
"माझा पती, माझं प्रेम... आता माझं काय उरलं?" असं म्हणत रडणाऱ्या चंद्रिकाने तिचा पती युगम गेरा याच्यावर विवाहबाह्य संबंधांचे खळबळजनक आरोप केले आहेत. ज्या युगमने तिच्या संघर्षाच्या काळात खंबीर साथ दिली, तोच आता दगा देत असल्याचा दावा तिने केला आहे.
advertisement
3/9
चंद्रिकाचा पती युगम गेरा याचा जन्म १९९१ मध्ये उत्तराखंडमधील रुद्रपूर येथे झाला. त्याने इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं आहे. चंद्रिका आणि युगम यांची भेट दिल्लीत झाली होती. चंद्रिका मूळची इंदूरची असून नोकरीच्या शोधात ती दिल्लीत आली होती.
advertisement
4/9
त्यावेळी युगम एका खाजगी कंपनीत नोकरी करत होता आणि चंद्रिका हल्दीराममध्ये काम करायची. युगम चंद्रिकापेक्षा वयाने दोन-तीन वर्षांनी लहान आहे, पण चंद्रिकाने सांगितलेलं की, त्याने एखाद्या पालकाप्रमाणे तिची जबाबदारी सांभाळली होती.
advertisement
5/9
चंद्रिकाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तिने युगमचे काही चॅट्स आणि एका दुसऱ्या महिलेसोबतचे फोटो उघड केले आहेत. ती म्हणते, "मी घराबाहेर पडते, काम करते, मुलाला सांभाळते आणि तुम्ही हे उद्योग करताय? गेल्या दोन महिन्यांपासून मी हे सहन करतेय."
advertisement
6/9
चंद्रिकाच्या या आरोपांमुळे नेटकऱ्यांमध्ये दोन गट पडले आहेत. काहींना तिच्याबद्दल सहानुभूती वाटतेय, तर काहींना हा प्रसिद्धी मिळवण्यासाठी केलेला एक पब्लिसिटी स्टंट वाटतोय. "वडापावचा धंदा बंद झाला की काय?" अशा खोचक कमेंट्स करत नेटकऱ्यांनी चंद्रिकाला ट्रोल करायलाही सुरुवात केली आहे.
advertisement
7/9
चंद्रिका आणि युगमला 'रुद्र' नावाचा एक लहान मुलगा आहे. एकेकाळी रस्त्यावर सायकलवर वडापाव विकणाऱ्या या जोडप्याने मेहनतीने स्वतःचं दुकान थाटलं. चंद्रिकाने 'बिग बॉस'मध्ये दावा केला होता की, ती दिवसाला तब्बल ४०,००० रुपये कमावते. युगमने तिला इथपर्यंत पोहोचवण्यासाठी खूप मदत केली होती.
advertisement
8/9
अगदी 'बिग बॉस'च्या प्रीमिअरच्या दिवशीही त्याने "मी आणि रुद्र तुला मिस करू, तूच जिंकणार" अशी भावनिक पोस्ट लिहिली होती. मग आता अचानक असं काय घडलं की त्यांच्या सुखी संसाराला दृष्ट लागली?
advertisement
9/9
चंद्रिकाने इतके गंभीर आरोप करूनही युगम गेराने अद्याप यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. हे प्रकरण कायदेशीर वळण घेणार की सोशल मीडियावरच संपणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
ज्याने पालकांसारखं सांभाळलं, त्यानेच दिला धोका? वडापाव गर्लचे नवऱ्यावर चीटिंगचे आरोप, कोण आहे युगम गेरा?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल