Vandana Gupte : वंदना गुप्ते गळ्यात घालून मिरवतात राजघराण्यातला दागिना, त्यांना तो कोणी दिला? म्हणाल्या, 'लाख रुपये दिले तरी...'
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Vandana Gupte : वंदना गुप्ते यांच्या गळ्यात राजघराण्यातलं रत्न आहे. नुकतचं एका मुलाखतीत त्यांनी याबाबत भाष्य केलं आहे.
advertisement
1/7

मराठी मनोरंजनसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी आपल्या विविध धाटणीच्या कलाकृतींच्या माध्यमातून प्रेक्षकांवर आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. कधी नाटक, मालिका तर कधी चित्रपटांमुळे त्या चर्चेत असतात.
advertisement
2/7
वंदना गुप्ते सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहेत. एबीपीला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या,"मी माझे पती शिरीष यांच्यासोबत जयपूरला फिरायला गेले होते तेव्हा त्यांनी मला जयपूरच्या राजघराण्यातला एक दागिना घेऊन दिला".
advertisement
3/7
राजघराण्यातल्या दागिनाचा किस्सा शेअर करताना वंदना गुप्ते म्हणाल्या,"जयपूरमधील एका दुकाणात मला एक मणी खूप आवडला. नवरा झोपलेला असल्याने मी त्याला न विचारता दुकानदाराला अॅडव्हान्स देऊन तो मनी विकत घेतला. त्यावेळी त्याने मला 9 हजार रुपये सांगितले. त्यामुळे मी त्याला 5 हजार देऊन तो मनी ताब्यात घेतला".
advertisement
4/7
वंदना गुप्ते म्हणाल्या,"नवरा झोपेतून उठल्यानंतर त्यांना घेऊन मी पुन्हा त्या दुकानात गेले. उरलेले पैसे दिले. नवऱ्यालाही तो मनी फारच आवडला होता".
advertisement
5/7
वंदना गुप्ते पुढे म्हणाल्या,"मनी विकत घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी दुकानादाराच्या मालकाचा फोन आला. तो म्हणाला,"हा मनी नुस्ता शोचा आहे. राजघराण्याचं कलेक्शन म्हणून तो ठेवला होता. पण आमच्या सेलरने तो तुम्हाला विकला".
advertisement
6/7
दुकानमालकाला त्यावेळी वंदना गुप्ते म्हणाल्या होत्या,"आता हा मनी माझ्याकडे आला आहे. त्यामुळे तुम्ही लाख रुपये दिले तरी तो मी तुम्हाला देणार नाही". पुढे वंदना ताई म्हणाल्या,"माझ्या सासुबाई म्हणायच्या की माझी घारीची नजर आहे".
advertisement
7/7
वंदना गुप्ते यांचा 'अशी ही जमवा जमवी' हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला असून सध्या त्यांचं 'कुटुंब किर्रतन' या नाटकाच्या माध्यमातून त्या प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Vandana Gupte : वंदना गुप्ते गळ्यात घालून मिरवतात राजघराण्यातला दागिना, त्यांना तो कोणी दिला? म्हणाल्या, 'लाख रुपये दिले तरी...'