Movie Theater : कोणती फिल्म कोणत्या थिएटरला पाहायची हे कसं ठरवायचं?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Movie Theater : कोणतीही फिल्म कोणत्याही थिएटरला पाहून चालत नाही. यासाठी फिल्मचा जॉनर, वेळ, बजेट, थिएटरमधील सुविधा यादेखील महत्त्वात्या आहेत.
advertisement
1/9

थिएटर आणि मुव्ही निवडताना गोंधळ होणं अगदी नैसर्गिक आहे. पण काही स्मार्ट पॉईंट्स लक्षात ठेवले तरी निर्णय पटकन, बरोबर आणि तुमच्या पसंतीनुसार होऊ शकतो.
advertisement
2/9
फिल्म कोणती आहे? कॉमेडी, रोमँटिक, थ्रिलर/हॉरर, फॅमिली एंटरटेनर की अॅक्शन? जॉनर ठरला की थिएटरच्या शो लिस्ट कमी होते आणि निर्णय सोपा होतो.
advertisement
3/9
थिएटर किती दूर आहे हे खूप महत्त्वाचं: जवळचं थिएटर वेळ आणि प्रवास खर्च कमी. थोडं लांब, पण चांगला अनुभव त्यासाठी खास प्लॅन करा किंवा वीकेंड बेस्ट. जवळच्या थिएटरमध्ये पसंतीचा शो नसेल तरच दूरचं थिएटर निवडा.
advertisement
4/9
मुव्हीनुसार थिएटर निवडा. मोठा अॅक्शन/साय-फाय मूव्ही असेल तर IMAX / 4DX / Dolby Atmos / PVR Luxe. कॉमेडी किंवा फॅमिली मुव्ही असेल तर नॉर्मल स्क्रीनही पुरेसा. हॉरर मुव्ही असेल तर डॉल्बी साऊंड असलेलं थिएटर जबरदस्त अनुभव देतं.
advertisement
5/9
काही थिएटरमध्ये सीट जुने असतात, काहींमध्ये रिक्लायनर सीट्स. लांब मुव्ही असेल तर रिक्लायनर सीट्स फायदेशीर. लहान मुव्ही असेल तर साध्या सीट चालतात.
advertisement
6/9
एकाच मुव्हीची किंमत थिएटरनुसार बदलते. PVR, INOX, Cinepolis थोडं महाग पण क्वालिटी चांगली. लोकल थिएटर स्वस्त पण कधीकधी स्क्रीन किंवा साऊंड साधारण असतो. तुम्ही तुमच्या पर्सनल बजेटनुसार निवडा.
advertisement
7/9
थिएचरचे गुगल रिव्ह्यू तपासा, बुक माय शो रेटिंग तपासा, युट्युब रिअॅक्शन पाहा. मुव्ही किती चांगला आहे किंवा थिएटरचा अनुभव कसा आहे याची माहिती मिळते.
advertisement
8/9
थिएटरला पार्किंग आहे का? फूड क्वालिटी कशी आहे? गर्दी जास्त असते का? हेही अनुभवावर परिणाम करणारे घटक आहेत.
advertisement
9/9
थिएटर कसं निवडायचं यासाठी एक सोपा फॉर्म्युला म्हणजे जॉनर + वेळ + बजेट + स्क्रीन/साऊंड = परफेक्ट थिएटर + परफेक्ट मुव्ही. उदा. आज ऍक्शन मूव्ही बघायची आहे + दुपारी वेळ आहे + बजेट ठीक आहे + Dolby Atmos हवाय → जवळचा Dolby थिएटर + Latest action movie.