TRENDING:

Who is Milind Chandwani : कोण आहे मिलिंद चांदवानी? 'बालिका वधू'सोबत करणार लग्न

Last Updated:
Who is Milind Chandwani :अविकाने सोशल मीडियावर तिच्या साखरपुड्याची माहिती दिली. तिचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. मात्र तिचा होणारा नवरा नेमका आहे तरी कोण? असा अनेकांना प्रश्न पडला आहे.
advertisement
1/7
कोण आहे मिलिंद चांदवानी? 'बालिका वधू'सोबत करणार लग्न
लोकप्रिय टीव्ही शो ‘बालिका वधू’मधून घराघरात पोहोचलेली आणि लहान वयात मोठं यश मिळवणारी अभिनेत्री अविका गोर आता तिच्या आयुष्यातील एका नव्या पर्वात प्रवेश करत आहे. अविकाने तिचा प्रियकर मिलिंद चांदवानी याच्यासोबत साखरपुडा केला आहे.
advertisement
2/7
अविकाने सोशल मीडियावर तिच्या साखरपुड्याची माहिती दिली. तिचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. मात्र तिचा होणारा नवरा नेमका आहे तरी कोण? असा अनेकांना प्रश्न पडला आहे.
advertisement
3/7
अविकाने प्रियकर मिलिंद चांदवानीसोबत साखरपुडा केला. ती गुलाबी साडीत आणि स्लीव्हलेस ब्लाउजमध्ये खूपच गोड दिसत होती. मिलिंदनेही बेज रंगाची शेरवानी घालून अत्यंत सोज्वळ लूक ठेवला होता.
advertisement
4/7
मिलिंद चांदवानी हा केवळ कॉर्पोरेट जगतातला यशस्वी प्रोफेशनल नाही, तर एक संवेदनशील सामाजिक कार्यकर्ता देखील आहे. सध्या तो कुकू एफएम मध्ये सीनियर प्रॉडक्ट मॅनेजर म्हणून काम करतो.
advertisement
5/7
त्याने स्थापन केलेली ‘कॅम्प डायरीज’ ही एनजीओ तरुणांना समाजासाठी काम करते. मिलिंद चांदवानी एक सोशल वर्करही आहे. तो एमटीव्ही रोडीज आणि झी हीरोज सारख्या रिअॅलिटी शोमध्ये देखील झळकला होता.
advertisement
6/7
अविका आणि मिलिंदची एका कॉमन फ्रेंडमुळे हैदराबादमध्ये पहिली भेट झाली. मैत्री झाली मग प्रेम झालं. काही वर्षांपासून ते एकमेकांना डेट करत होत. अविकाने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, “मिलिंदसारखं व्यक्तिमत्त्व माझ्यासाठी नवीन होतं शांत, समजूतदार आणि खंबीर.”
advertisement
7/7
दरम्यान, अविका सध्या 26 वर्षांची आहे, तर मिलिंद तिच्यापेक्षा 6 वर्षांनी मोठा आहे. दोघांचा साखरपुडा झाला असून चाहते आता त्यांच्या लग्नाची वाट पाहत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Who is Milind Chandwani : कोण आहे मिलिंद चांदवानी? 'बालिका वधू'सोबत करणार लग्न
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल