डिवोर्सच्या चर्चांदरम्यान योगिता चव्हाणचा मोठा निर्णय, चाहत्यांना दिली आनंदाची बातमी
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Yogita Chavan : अभिनेत्री योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले यांच्या डिवोर्सच्या चर्चा मागील काही महिन्यांपासून सुरू आहेत. दोघांनीही यावर अद्याप भाष्य केलेलं नाही. दरम्यान योगितानं चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे.
advertisement
1/7

अभिनेत्री योगिता चव्हाण मागील काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. योगिता आणि तिचा नवरा अभिनेता सौरभ चौघुले यांचा डिवोर्स झाल्याची माहिती समोर आली.
advertisement
2/7
दोघांनी त्यांच्या सोशल मीडियावरून लग्नाचे सगळे फोटो तसंच अनेक व्हिडीओ डिलिट केले. दोघांनी इन्स्टाग्रामवरून एकमेकांना अनफॉलो देखील केलं. या सगळ्यावरून योगिता आणि सौरभ यांचा डिवोर्स झाल्याच्या चर्चा रंगल्या. दरम्यान डिवोर्सच्या चर्चा सुरू असतानाच अभिनेत्री योगिता चव्हाणने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. काय आहे ती आनंदाची बातमी?
advertisement
3/7
'जीव माझा गुंतला' या मालिकेतून अभिनेत्री योगितानं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. याच मालिकेत सौरभ चौघुले देखील मुख्य भूमिकेत होता. अंतरा आणि मल्हार या जोडीनं प्रेक्षकांनी मनं जिंकली. जीव माझा गुंतला या मालिकेच्या सेटवरच योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले यांची लव्ह स्टोरी सुरू झाली होती.
advertisement
4/7
मालिकेच्या दोघे प्रेमात पडले आणि त्यानंतर मालिका संपताच दोघांनी लग्न केलं. पण त्यांचं लग्न एक वर्षही टिकलं नाही. लग्नाच्या वर्षभरात दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. योगिता आणि सौरभ यांपैकी कोणीही यावर अद्याप स्पष्टपणे वक्तव्य केलेलं नाही.
advertisement
5/7
'जीव माझा गुंतला' मालिकेनंतर योगिता थेट बिग बॉस मराठी 5 मध्ये दिसली. पण तिथेही फार काळ टिकली नाही. योगिता महिन्याभरातच बिग बॉसमधून आऊट झाली. योगिता लंबे रेस का घोडा आहे असं अनेकांना वाटलं होतं मात्र तिने हवा तसा खेळ खेळला नाही त्यामुळे प्रेक्षकांनीही तिच्याकडे पाठ फिरवली.
advertisement
6/7
'जीव माझा गुंतला' मालिका केली, लग्न, बिग बॉस मराठी आणि त्यानंतर डिवोर्सच्या चर्चा या सगळ्या कारणांमुळे मागील काही महिने योगिता सातत्यानं चर्चेत राहिली. योगिता आता पुन्हा पुन्हा चर्चेत येत राहणार आहे. कारण तिची नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येतेय.
advertisement
7/7
'जीव माझा गुंतला' मालिकेनंतर योगिता 'तू अनोळखी तरी सोबती' या मालिकेत दिसणार आहे. ही मालिका सन मराठीवर 5 जानेवारीपासून सुरू होणार आहे. अर्पिता असं योगिताच्या भूमिकेचं नाव आहे. अभिनेता अंबर गणपुळे या मालिकेत प्रमुख भूमिकेत आहे. योगिताला पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षकांनी उत्सुकता दाखवली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
डिवोर्सच्या चर्चांदरम्यान योगिता चव्हाणचा मोठा निर्णय, चाहत्यांना दिली आनंदाची बातमी