युझवेंद्र चहल-धनश्री वर्मा येणार आमने-सामने; घटस्फोटाच्या 10 महिन्यांनी एकत्र येण्याचं कारण काय?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Dhanashree Verma-Yuzvendra Chahal: फेब्रुवारी २०२५ मध्ये कायदेशीररीत्या वेगळे झाल्यानंतर, आता तब्बल १० महिन्यांनी हे दोघे पुन्हा एकदा एकाच मंचावर समोरासमोर येणार असल्याची दाट शक्यता आहे. ही बातमी सर्वांसाठीच धक्कादायक आहे.
advertisement
1/7

मुंबई: भारतीय क्रिकेट विश्वातील सर्वात चर्चेत असलेली जोडी म्हणजे युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा. या दोघांच्या लग्नापासून ते घटस्फोटापर्यंतच्या प्रवासाने सोशल मीडियावर नेहमीच वादळ निर्माण केलं.
advertisement
2/7
फेब्रुवारी २०२५ मध्ये कायदेशीररीत्या वेगळे झाल्यानंतर, आता तब्बल १० महिन्यांनी हे दोघे पुन्हा एकदा एकाच मंचावर समोरासमोर येणार असल्याची दाट शक्यता आहे. ही बातमी सर्वांसाठीच धक्कादायक आहे.
advertisement
3/7
मिळालेल्या माहितीनुसार, युझी आणि धनश्री यांना एका बिग बजेट रिअॅलिटी शोसाठी विचारणा करण्यात आली आहे. या शोचं नाव आहे 'The 50'. हा शो फ्रान्समधील गाजलेल्या 'लेस सिन्कुएंटे' (Les Cinquante) या कार्यक्रमाचा भारतीय अवतार असणार आहे.
advertisement
4/7
एका आलिशान महालात ५० सेलिब्रिटींना ठेवलं जाईल, जिथे कोणताही नियम नसेल. अशा नो रूल्स गेममध्ये जर हे एक्स पती-पत्नी एकत्र आले, तर ड्रामा आणि टीआरपीचा नवा विक्रम प्रस्थापित होईल, यात शंका नाही.
advertisement
5/7
काही काळापूर्वी 'राइज अँड फॉल' या शोमध्ये धनश्रीने आपल्या मोडलेल्या संसारावर पहिल्यांदाच मौन सोडलं होतं. ती म्हणाली होती, "मी माझ्या नात्यावर पूर्ण विश्वास ठेवला आणि माझं १०० टक्के योगदान दिलं. माझी अडचण हीच आहे की मी लोकांना खूप संधी देते. शेवटी जेव्हा पाणी डोक्यावरून गेलं, तेव्हा मी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. पण आजही मला त्याची काळजी वाटते." धनश्रीच्या या विधानानंतर त्यांच्यातील कटुता आता थोडी कमी झाली आहे का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
advertisement
6/7
'द ५०' हा शो जिओ हॉटस्टार (JioHotstar) आणि कलर्स टीव्हीवर प्रदर्शित होणार आहे. यात केवळ युझी-धनश्रीच नाही, तर अनेक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आणि बिग बॉसचे माजी स्पर्धकही दिसण्याची शक्यता आहे.
advertisement
7/7
एकाच महालात राहताना जुन्या जखमा भरून निघतील की वादाची नवीन ठिणगी पडेल, हे पाहणं रंजक ठरेल. सध्या या दोघांची टीम मेकर्ससोबत चर्चा करत असल्याचं समजतंय, मात्र अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
युझवेंद्र चहल-धनश्री वर्मा येणार आमने-सामने; घटस्फोटाच्या 10 महिन्यांनी एकत्र येण्याचं कारण काय?