TRENDING:

Weather Alert: कल्याण-डोंबिवलीत पारा घसरला, 24 तास महत्त्वाचे, हवामान विभागाचा पुन्हा अलर्ट

Last Updated:
Weather Alert: राज्यातील हवामानात सातत्याने बदल जाणवत असून ठाणे, कल्याण-डोंबिवली परिसरात पारा घसरला आहे. 26 डिसेंबरचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
1/5
कल्याण-डोंबिवलीत पारा घसरला, 24 तास महत्त्वाचे, हवामान विभागाचा पुन्हा अलर्ट
राज्यातील हवामानात सातत्याने बदल जाणवत आहेत. डिसेंबरमध्ये थंडीचा कडाका वाढला असून मुंबई-ठाण्यातही गारठा जाणवत आहे. उत्तरेतून येणाऱ्या शीतलहरींमुळे पारा घसरला असून काही ठिकाणी थंडीची लाट आल्याची स्थिती आहे. ठाण्यासह कल्याण-डोंबिवली परिसरात 26 डिसेंबरला हवामान कसं असेल? जाणून घेऊ.
advertisement
2/5
कल्याण तालुक्यातील हवामानात गारवा असून आज 26 डिसेंबर रोजी हवामान निरभ्र आणि कोरडे राहण्याचा अंदाज आहे. किमान तापमान 22 अंश तर कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस राहील. आज थंडीची झुळूक असेल आणि धुक्याचाही प्रभाव जाणवू शकतो.
advertisement
3/5
उत्तरेकडून येणाऱ्या थंडीमुळे डोंबिवली शहरात 26 डिसेंबर रोजी गारठा वाढला आहे. किमान तापमान 18 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 23 अंश सेल्सिअस पर्यंत असू शकते. दिवसा उन्ह असेल आणि हवामान सुखद राहील, पण थंडीमुळे आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे,
advertisement
4/5
कल्याण-डोंबिवली ग्रामीण भागात आज 26 डिसेंबर रोजी पारा पुन्हा घसरला आहे. काही ठिकाणी किमान तापमान 10 अंशांपर्यंत घसरले आहे. सकाळी हवामान थंडगार असेल, तर दिवसा तापमान वाढून उन्हाचा अनुभव येईल. किमान तापमान 18 ते 20 अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान 30 ते 32 अंश सेल्सिअस राहील.
advertisement
5/5
डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात बदलापूरमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. किमान तापमान 15 अंश सेल्सिअस तर कमाल 26 अंशांपर्यंत राहील. मुरबाड आणि शहापूर तालुक्यातील कमाल तापमान 30 ते 32 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 14 ते 20 अंश सेल्सिअसपर्यंत राहील. गारठा वाढल्याने नागरिकांना आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Kalyan Dombivli/
Weather Alert: कल्याण-डोंबिवलीत पारा घसरला, 24 तास महत्त्वाचे, हवामान विभागाचा पुन्हा अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल