Open Marriage : लग्न झालं असूनही मिळते दुसऱ्यासोबत नातं ठेवण्याची परवानगी? ओपन मॅरेजचा नेमका अर्थ काय, का वाढतोय याचा ट्रेंड?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
गेल्या काही दिवसांपासून या नात्यांच्या व्याख्या बदलताना दिसत आहेत. विशेषतः ग्लॅमर जगतातील काही विधानांमुळे आता 'ओपन मॅरेज' आणि 'ओपन रिलेशनशिप' या शब्दांनी मध्यमवर्गीय घरांच्या दिवाणखान्यातही शिरकाव केला आहे.
advertisement
1/8

भारतीय समाजात लग्न म्हणजे दोन व्यक्तींमधील एक पवित्र आणि अतूट बंधन मानलं जातं. एकदा गाठ बांधली की ती मरेपर्यंत सुटायची नाही, हेच तत्व आपल्याला परंपरेने शिकवलं आहे. पती-पत्नीचं नातं हे पूर्णपणे एकमेकांप्रती असलेल्या निष्ठेवर टिकून असतं, असं आपण ऐकत आलेलो आहोत. पण, गेल्या काही दिवसांपासून या नात्यांच्या व्याख्या बदलताना दिसत आहेत. विशेषतः ग्लॅमर जगतातील काही विधानांमुळे आता 'ओपन मॅरेज' आणि 'ओपन रिलेशनशिप' या शब्दांनी मध्यमवर्गीय घरांच्या दिवाणखान्यातही शिरकाव केला आहे.
advertisement
2/8
नुकताच 'कॉफी विथ करण' या शोमधील बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणचा एक जुना व्हिडिओ पुन्हा व्हायरल झाला आणि नेटिझन्समध्ये वादाला तोंड फुटलं. लग्नाआधी ती रणवीर सिंगसोबत 'ओपन रिलेशनशिप'मध्ये होती, या तिच्या विधानाचा धागा पकडत आता तरुण पिढीमध्ये "एकच जोडीदार पुरेसा नाही का?" यावर मोठी चर्चा सुरू झाली आहे.
advertisement
3/8
1. लग्नाच्या पारंपारिक व्याख्या आणि बदललेला काळमानवी समाजात स्त्री-पुरुषांमधील संबंध हे प्रामुख्याने धार्मिक आणि सामाजिक चौकटीत बसवलेले असतात. विवाह ही एक अशी संस्था आहे जिथे काही नियम आणि रीतीरिवाजांनुसार एका पुरुष आणि स्त्रीला 'पती-पत्नी' म्हणून मान्यता मिळते. मात्र, पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव आणि वैयक्तिक स्वातंत्र्याची वाढती ओढ यामुळे आता या बंधनातून मुक्त होण्याची इच्छा अनेकांमध्ये दिसत आहे.
advertisement
4/8
2. लिव्ह-इन रिलेशनशिप ते ओपन रिलेशनशिप, प्रवासाचे टप्पेलिव्ह-इन (Live-in): यात दोघेही विनालग्न एकत्र राहून एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करतात. लग्नाची जबाबदारी टाळण्यासाठी किंवा लग्नाआधीची 'चाचणी' म्हणून याकडे पाहिलं जातं.
advertisement
5/8
ओपन रिलेशनशिप (Open Relationship): इथूनच नात्याचं स्वरूप बदलतं. सोप्या भाषेत सांगायचं तर, तुम्ही एका व्यक्तीसोबत मुख्य नात्यात आहात, पण शारीरिक किंवा काही काळापुरत्या आनंदासाठी तुम्ही दुसऱ्या जोडीदाराची निवड करू शकता. याला जोडीदाराची संमती असते.
advertisement
6/8
3. 'ओपन मॅरेज' म्हणजे नक्की काय?नावाप्रमाणेच यात लग्नाचं बंधन 'ओपन' असतं. यात पती-पत्नी एकमेकांप्रती पूर्णपणे बांधील नसतात.यात दुसऱ्या व्यक्तीशी संबंध ठेवणे म्हणजे 'धोका' किंवा 'फसवणूक' मानली जात नाही. उलट, अनेकदा जोडीदार एकमेकांच्या संमतीने किंवा पसंतीने तिसऱ्या व्यक्तीसोबत वेळ घालवतात.ओपन रिलेशनशिपमध्ये बाहेरील व्यक्तीशी फक्त शारीरिक संबंध (One time sex experience) किंवा काही दिवसांची डेटिंग स्वीकारली जाते. पण अट अशी असते की, त्या तिसऱ्या व्यक्तीशी तुमचं 'भावनिक' किंवा 'रोमँटिक' नातं जोडलं जाता कामा नये.
advertisement
7/8
4. हे ट्रेंड्स का वाढत आहेत?आधुनिक जीवनशैलीत 'कमिटमेंट'ची भीती आणि सतत काहीतरी नवीन शोधण्याची ओढ यामुळे असे प्रकार वाढत आहेत. 'स्विंगिंग' किंवा 'पॉलिअॅमरी' यांसारख्या शब्दांचा वापर पाश्चात्य देशात मोठ्या प्रमाणावर होतो. भारतातील महानगरांमध्येही आता हे विचार मूळ धरू लागले आहेत. या नात्यात राहणारे लोक स्वतःच्या प्रायमरी रिलेशनशिपला प्राधान्य देतात, पण तरीही त्यांना 'दुसऱ्याची' ओढ असते.
advertisement
8/8
रिलेशनशिप कोणत्याही प्रकारची असली तरी ती टिकवण्यासाठी विश्वास आणि संवाद महत्त्वाचा असतो. दीपिका-रणवीरच्या विधानावर चर्चा होत राहील, पण भारतीय मानसिकतेत ओपन मॅरेज ही संकल्पना अजूनही पचनी पडणे कठीण आहे. नात्यात मोकळेपणा असावा की मर्यादा, हा शेवटी ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असला, तरी सामाजिक मूल्यांवर होणारा परिणाम नाकारता येत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Open Marriage : लग्न झालं असूनही मिळते दुसऱ्यासोबत नातं ठेवण्याची परवानगी? ओपन मॅरेजचा नेमका अर्थ काय, का वाढतोय याचा ट्रेंड?