TRENDING:

अचानक संपवली 'पारू', प्रसाद जवादेला महिन्याभरात मिळाली दुसरी मालिका; या अभिनेत्रीसोबत दिसणार

Last Updated:
Prasad Jawade New Serial : पारू मालिका संपल्याच्या महिन्याभरातच आदित्य पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अभिनेत्याच्या मालिकेचा प्रोमो समोर आला आहे.
advertisement
1/8
अचानक संपवली 'पारू', प्रसाद जवादेला महिन्याभरात मिळाली दुसरी मालिका; या अभिनेत्रीसोबत दिसणार
कलाकार मंडळींना काम मिळवणं आणि ते टिकवून ठेवणं हे खूप टफ चॅलेंज असतं. स्पर्धेच्या जगात काम मिळवणं कठीण झालं आहे. पण असे काही कलाकार असतात ज्यांना एका कामातून दुसरं काम मिळत जातं.
advertisement
2/8
असाच एका अभिनेता ज्याची एक मालिका काही दिवसांआधीच संपली. मालिका संपल्यानंतर आता तो दिसणार नाही असं प्रेक्षकांना वाटलं होतं. मात्र महिन्याभरातच त्याच्या नव्या मालिकेचा प्रोमो समोर आला आहे.
advertisement
3/8
आपण बोलत आहोत अभिनेता प्रसाद जवादे याच्याबद्दल. झी मराठीच्या 'पारू' या मालिकेतून प्रसाद जवादेनं अनेक वर्षांनी कमबॅक केलं होतं. 'पारू' या मालिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत होता. फेब्रुवारी 2024 साली ही मालिका सुरू झाली. तब्बल दोन वर्ष या मालिकेनं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.
advertisement
4/8
पारू ही मालिका 6 फेब्रुवारी 2026 रोजी ऑफ एअर गेली. प्रेक्षकांना कोणतीही पूर्वकल्पना न देता या मालिकेचा शेवटचा एपिसोड टेलिकास्ट झाला. ज्यामुळे प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती.
advertisement
5/8
या मालिकेत अभिनेता प्रसाद जवादे आणि अभिनेत्री शरयू सोनावणे हे कलाकार प्रमुख भूमिकेत होते. दरम्यान पारू ही मालिका संपल्यानंतर अभिनेता प्रसाद जवादे आता झी मराठीच्या नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
advertisement
6/8
'दीपज्योती' असं प्रसादच्या नव्या मालिकेचं नाव असून या मालिकेत शिवा फेम अभिनेत्री शिवा म्हणजेच पूर्वा कौशिकबरोबर ती स्क्रिन शेअर करणार आहे. दीप असं प्रसादच्या भूमिकेचं नाव आहे.
advertisement
7/8
'दीपज्योती' या मालिकेचा प्रोमो समोर आला आहे. ज्यात प्रसाद जवादेची पहिली झलक पाहायला मिळत आहे. आईच्या विरहात मनातून पूर्णपणे तुटलेला, अल्कोहोलिक झालेला अशी प्रसाद जवादेची दीप ही भूमिका आहे. जो दारूच्या नशेत स्वत:चं डोकं काचेवर आपटून घेतो.
advertisement
8/8
प्रसाद जवादेचा एक वेगळाच अंदाज प्रेक्षकांना या मालिकेच्या निमित्तानं पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर कधी एकमेकांचे स्पर्धक असलेले आदित्य आणि शिवा आता एकत्र एकाच मालिकेत दिसणार आहेत. ही जोडी पाहण्यासाठी प्रेक्षकांनी उत्सुकता दाखवली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
अचानक संपवली 'पारू', प्रसाद जवादेला महिन्याभरात मिळाली दुसरी मालिका; या अभिनेत्रीसोबत दिसणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल