TRENDING:

Weather Alert: कल्याण-डोंबिवलीत वारं फिरलं, हवामानात मोठे उलटफेर, पाहा आजचं अपडेट

Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. 16 जानेवारीचं कल्याण-डोंबिवली परिसरातील हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
1/5
कल्याण-डोंबिवलीत वारं फिरलं, हवामानात मोठे उलटफेर, पाहा आजचं अपडेट
जानेवारीच्या मध्यावर राज्यातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. उत्तर भारतातून येणाऱ्या शीतलहरींमुळे काही ठिकाणी गारठा वाढला आहे. तर काही भागात तापमानात वाढ झालीये. मुंबई, ठाणे परिसरात हवामानात चढ-उतार जाणवत आहेत. 16 जानेवारीला कल्याण-डोंबिवली परिसरातील हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
2/5
कल्याण तालुक्यात हवामान स्वच्छ आणि अंशतः सूर्यप्रकाशित राहण्याची शक्यता आहे. किमान तापमान 19 अंश सेल्सिअस तर कमाल 33 अंश सेल्सिअस राहील. हवेत जास्त आर्द्रता नसून, दिवसा उबदार आणि रात्री थंड हवामान असेल.
advertisement
3/5
डोंबिवलीत आज हवामानात मोठे बदल अपेक्षित असून थंड आणि कोरडे राहण्याची शक्यता आहे. गुरुवारी पारा अचानक घसरला होता. आज तो पुन्हा स्थिर होऊन किमान तापमान 14 अंश सेल्सिअस आणि कमाल 30 अंश सेल्सिअस राहील.
advertisement
4/5
कल्याण-डोंबिवली ग्रामीण भागात हवामान स्वच्छ आणि आल्हाददायक राहण्याची शक्यता आहे. किमान तापमान 18 अंश तर कमाल 30 अंश सेल्सिअस राहील. शुक्रवारी हवामान कोरडे राहील आणि थंडीचा प्रभाव जाणवेल.
advertisement
5/5
बदलापूरमध्ये हवामान निरभ्र आणि थंड राहण्याचा शक्यता असून किमान तापमान 8 अंश सेल्सिअस राहील. शहापूर, मुरबाड परिसरात हवामान स्वच्छ राहण्याची शक्यता असून किमान तापमान 15 अंश सेल्सिअस तर कमाल 30 अंश सेल्सिअस असेल. सकाळच्या वेळी हवा चांगली असली तरी प्रदूषणाची पातळी वाढू शकते, त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Kalyan Dombivli/
Weather Alert: कल्याण-डोंबिवलीत वारं फिरलं, हवामानात मोठे उलटफेर, पाहा आजचं अपडेट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल