Weather Alert: कल्याण-डोंबिवलीत हवा बिघडली, बर्फासारखी थंडी पडणार? हवामान विभागाचा अलर्ट
- Reported by:GEETA PANDHARINATH GAIKAR
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Weather Alert: राज्यातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. ठाण्यासह कल्याण डोंबिवली परिसरातील हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
1/5

महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत असून, पुढील तीन ते चार दिवस चढ-उतार होत राहतील. काही ठिकाणी थंडी कमी असून दुपारच्या वेळी उष्णता जाणवेल, तर काही ठिकाणी हलके धुके आणि किंचित गारठा राहील. मुंबईत उशिरापर्यंत धुके आणि ठाणे जिल्ह्यात सुखद थंडी कायम आहे. 20 जानेवारीला कल्याण-डोंबिवली परिसरातील हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
2/5
कल्याण तालुक्यात हवामान स्वच्छ, कोरडे आणि निरभ्र असून हलके वारे वाहतील. त्यामुळे दिवसा हवामान आल्हाददायक राहील. किमान तापमान 20 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस राहील. त्यामुळे दिवसा आरामदायी आणि रात्री किंचित थंडीचा अनुभव येईल.
advertisement
3/5
डोंबिवली शहरातील हवामानात देखील बदल जाणवत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून वातावरण स्वच्छ, कोरडे आणि सुखद राहील. तसेच पुढील काही दिवस हीच स्थिती बघायला मिळेल. किमान तापमानात बदल न होता 18 अंश तर कमाल 29 अंश सेल्सिअस राहील. त्यामुळे दिवसा हलकी थंडी जाणवून हवामान आल्हाददायक राहण्याची शक्यता आहे.
advertisement
4/5
कल्याण-डोंबिवली ग्रामीण भागात हवामान स्वच्छ आणि स्थिर राहण्याची शक्यता आहे. किमान तापमान 15 अंश तर कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस राहील. पुढील काही दिवस तापमान स्थिर असून, थंडीची लाट नसली तरी सकाळ आणि संध्याकाळ सुखद हवामान अनुभवायला मिळेल.
advertisement
5/5
बदलापूरमधील हवामान निरभ्र ते अंशतः ढगाळ राहील. उशिरापर्यंत सकाळी धुके असल्याने, किमान तापमान 16 अंश तर कमाल तापमान 22 अंश सेल्सिअस असेल. शहापूर, मुरबाडमध्ये हवामान स्वच्छ आणि कोरडे राहील. तापमान कमी झाल्याने सकाळी व रात्री थंडी जाणवेल. किमान तापमान 14 अंश तर कमाल 33 अंश सेल्सिअस राहील. सततच्या हवामान बदलांमुळे आरोग्याची काळजी घ्यावी.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Kalyan Dombivli/
Weather Alert: कल्याण-डोंबिवलीत हवा बिघडली, बर्फासारखी थंडी पडणार? हवामान विभागाचा अलर्ट