TRENDING:

Cucumber : फक्त रंग पाहून काकडी घेऊ नका; कडूपणा ओळखण्यासाठी 'हे' 5 सोपे उपाय करुन पाहा

Last Updated:
आपल्या सर्वांची पहिली पसंती असते ती म्हणजे काकडी. सॅलड असो, कोशिंबीर किंवा नुसती मीठ लावून खाल्लेली काकडी. उन्हाळ्यात ती अमृतासारखी वाटते. शरीर 'डिटॉक्स' करण्यासाठी आणि पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी काकडीचे सेवन अत्यंत फायदेशीर मानले जाते.
advertisement
1/10
Cucumber : फक्त रंग पाहून काकडी घेऊ नका; कडूपणा ओळखण्यासाठी 'हे' 5 सोपे उपाय करुन पाहा
मार्च महिना संपता संपता उन्हाचा कडाका वाढू लागला आहे आणि अशा वेळी शरीराला थंडावा देण्यासाठी लोक थंड गोष्टी खाण्याकडे जास्त भर देतात, ज्यामध्ये कलिंगड, काकडी, दही अशा थंड गोष्टी खाल्या जातात. ज्यामुळे शरीर तर शांत रहातंच शिवाय शरीरातील पाण्याची कमतरता देखील पूर्ण होते. यामध्ये काकडीला सुपरफुड मानलं जातं, कारण ती शरीरासाठी हेल्दी ही असते आणि यामुळे पोट भरलेलं रहातं. पण अनेकदा लोक अनुभवतात की त्यांनी विकत घेतलेली काकडी कडू निघते. अशावेळी लोकांच्या मनात येतं की काकडी कडू आहे की नाही हे विकत घेताना कळलं तर बरं होईल.
advertisement
2/10
आपल्या सर्वांची पहिली पसंती असते ती म्हणजे काकडी. सॅलड असो, कोशिंबीर किंवा नुसती मीठ लावून खाल्लेली काकडी. उन्हाळ्यात ती अमृतासारखी वाटते. शरीर 'डिटॉक्स' करण्यासाठी आणि पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी काकडीचे सेवन अत्यंत फायदेशीर मानले जाते.
advertisement
3/10
एका कडू काकडीमुळे जेवणाची संपूर्ण चव बिघडते आणि मनही विटतं. अनेकदा दुकानदार आपल्याला न कळत कडू काकड्या पदरात पाडतात. पण आता काळजी करू नका. काकडी कडू आहे की गोड, हे तुम्ही विकत घेण्यापूर्वीच ओळखू शकता. कसं? चला जाणून घेऊया या खास टिप्स.
advertisement
4/10
1. रंग आणि पोत (Color and Texture)काकडीचा रंग तिच्या चवीबद्दल बरंच काही सांगून जातो. काकडी निवडताना ती नेहमी गडद हिरव्या रंगाची निवडा. अशी काकडी ताजी असते. जर काकडी फिकट पिवळसर, पांढरट किंवा त्यावर डाग असतील, तर समजून जा की ती एकतर जुनी आहे किंवा आतून कडू निघण्याची शक्यता जास्त आहे.
advertisement
5/10
2. दाबून तपासा (Touch Test)काकडी हातात घेतल्यावर तिला हलकेच दाबून पहा. जर काकडी सख्त आणि कडक असेल, तर ती खाण्यासाठी उत्तम आहे. मात्र, जर ती हाताला मऊ किंवा 'स्पंजी' (Sponge) वाटत असेल, तर ती आतून खराब झालेली असू शकते आणि अशा काकड्यांमध्ये कडूपणा ठासून भरलेला असतो.
advertisement
6/10
3. आकार महत्त्वाचा आहे (Size Matters)मोठी आणि जाड काकडी पाहून आपण अनेकदा आकर्षित होतो, पण इथेच आपली चूक होते. जास्त जाड आणि पिवळसर पडलेल्या काकड्यांमध्ये बिया जास्त असतात आणि त्या कडू असण्याची शक्यता 80% असते. त्याऐवजी मध्यम आकाराच्या, लांब आणि सरळ काकड्या निवडणे नेहमीच फायदेशीर ठरते.
advertisement
7/10
4. वासावरून ओळखा (The Scent Test)ताज्या काकडीला एक विशिष्ट प्रकारचा मनमोहक आणि 'फ्रेश' वास असतो. जर काकडीचा वास घेताना तुम्हाला काहीतरी वेगळा किंवा उग्र दर्प येत असेल, तर ती काकडी अजिबात घेऊ नका. अशा काकड्या चवीला कडू आणि आरोग्यासाठी घातक ठरू शकतात.
advertisement
8/10
5. 'फेसाचा' घरगुती प्रयोग (The Foam Trick)काकडी घरी आणल्यानंतर तिचा कडूपणा काढण्यासाठी एक जुना पण प्रभावी उपाय म्हणजे काकडीचा देठाकडचा भाग थोडा कापून घ्या आणि तो भाग काकडीवर गोल-गोल घासा. असं केल्यावर जो पांढरा फेस बाहेर येतो, तो म्हणजेच काकडीचा कडूपणा (Cucurbitacin) असतो. हा फेस पूर्णपणे काढून टाकल्याने काकडीची चव सुधारते.
advertisement
9/10
काकडी निवडताना या छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या, तर तुमची फसवणूक होणार नाही आणि उन्हाळ्यात तुमच्या ताटाची शोभा वाढवणारी काकडी चवीलाही गोड लागेल. निरोगी राहा आणि उन्हाळ्याचा आनंद घ्या.
advertisement
10/10
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे, न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही, आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Cucumber : फक्त रंग पाहून काकडी घेऊ नका; कडूपणा ओळखण्यासाठी 'हे' 5 सोपे उपाय करुन पाहा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल