Women Health : गर्भनिरोधकांचा बिनधास्त वापर करणं ठरू शकतं घातक! एक चूक अन् महिलेनं गमावले डोळे..
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Contraceptives side effects : नको असलेली गर्भधारणेसाठी बऱ्याचदा महिला गर्भनिरोधकांचा वापर करतात. अशावेळी इमर्जन्सी टॅब्लेट्स किंवा गर्भनिरोधक इंजेक्शन यांचा वापर केला जातो. मात्र हे आपल्या शरीरासाठी चांगलं असेलच असं नाही. यांचा वारंवार वापर केल्यास त्याचे दुष्परिणाम आपल्या शरीरावर दिसू शकतात. अशी एका महिलेला आपली दृष्टी गमवावी लागली.
advertisement
1/7

गर्भनिरोधक इंजेक्शनमुळे असाच गंभीर प्रकार एका महिलेसोबत घडला. एका ब्रिटिश महिला जिचे नाव निकोला आहे, तिच्यासोबतही असंच झालं. 'द मिरर'च्या वृत्तानुसार, या महिलेले नाव असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी गर्भनिरोधक इंजेक्शन घेतलं. त्यानंतर काही काळातच या महिलेची दृष्टी गेली.
advertisement
2/7
आजतकनुसार, अहवालात सांगितलं गेलं आहे की, या महिलेने गर्भधारणा टाळण्यासाठी गर्भनिरोधक इंजेक्शन घेतले. पण इंजेक्शन घेतल्यानंतर काही आठवड्यांनी तिला डोक्याच्या मागच्या बाजूला तीव्र दाब आणि डोळ्यांमध्ये जडपणा जाणवू लागला.
advertisement
3/7
सुरुवातीला तिला वाटलं, साधी डोकेदुखी असेल, पण हळूहळू तिची दृष्टी धूसर होऊ लागली आणि नंतर तिला पूर्णपणे दिसणं बंद झाले. सामान्यपणे अनेक महिला बऱ्याचदा आपल्या शारीरिक त्रासांकडे दुर्लक्ष करतात आणि यामुळे त्रास आणखी वाढतात.
advertisement
4/7
या महिलेसोबतच तसंच झालं. तिला वाटलं कामाच्या तणावामुळे डोकं दुखत असेल. पण जेव्हा दृष्टी कमी झाली तेव्हा तिच्या लक्षात आलं. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर कळलं की, तिच्या शरीराने या हार्मोनल बदलावर तीव्र प्रतिक्रिया दिली होती.
advertisement
5/7
तपासण्या केल्यानंतर कळलं की, या महिलेला 'इडिओपॅथिक इंट्राक्रॅनियल हायपरटेन्शन' (IIH) नावाचा आजार होता, जो खरं तर खूप दुर्मिळ आहे. गर्भनिरोधकातील हार्मोन्समुळे तिच्या मेंदूभोवतीच्या द्रवांमध्ये असामान्यपणे उच्च दाब निर्माण झाला होता. या वाढलेल्या दाबाचा थेट परिणाम ऑप्टिक नर्व्हवर झाला, ज्यामुळे गंभीर इजा होऊ तिची दृष्टी गेली.
advertisement
6/7
या महिलेने दीर्घकाळ उपचार घेतले. अनेक आठवडे ती रुग्णालयात होती. डॉक्टरांनी तिच्या मेंदूवरील दाब कमी करण्यासाठी अनेक प्रक्रिया केल्या. मात्र डॉक्टरांनी सर्व प्रयत्न करूनही तिची दृष्टी पूर्णपणे परत आणता आली नाही.
advertisement
7/7
आता ती महिला सोशल मीडिया आणि इतर माध्यमांद्वारे, गर्भनिरोधकांचा वापर करण्यापूर्वी डॉक्टरांनाच सल्ला घ्यावा, असा संदेश इतर महिलांना देत आहे. तज्ञांचाही सल्ला आहे की, गर्भनिरोधकांचा वापर करण्यापूर्वी योग्य ती खबरदारी नक्की घ्या. (Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Women Health : गर्भनिरोधकांचा बिनधास्त वापर करणं ठरू शकतं घातक! एक चूक अन् महिलेनं गमावले डोळे..