कैरीची चटणी आता बनवाच! उन्हाळ्यात जेवणासोबत चटपटीत झटका, संपूर्ण रेसिपी
- Reported by:Pragati Bahurupi
- Published by:Mohan Najan
Last Updated:
रोजच्या जेवणात काहीतरी वेगळं आणि चटपटीत खाण्याची इच्छा अनेकदा होते. अशा वेळी कमी वेळात आणि अगदी घरच्या घरी तयार होणारी कैरीची चटणी हा उत्तम पर्याय ठरू शकतो.
advertisement
1/7

उन्हाळा सुरू झाला की घराघरांत लोणची, पापड, कुरडया यांची लगबग सुरू होते. मात्र रोजच्या जेवणात काहीतरी वेगळं आणि चटपटीत खाण्याची इच्छा अनेकदा होते.
advertisement
2/7
अशा वेळी कमी वेळात आणि अगदी घरच्या घरी तयार होणारी कैरीची चटणी हा उत्तम पर्याय ठरू शकतो. अमरावतीतील गृहिणी मंदा बहुरूपी यांनी ही रेसिपी सांगितली आहे. आंबट कैरी, ताजं खोबरं आणि सुगंधी कोथिंबीर यांचा मिलाफ या चटणीला एक वेगळीच चव देतो.
advertisement
3/7
कैरीची चटणी बनविण्यासाठी लागणारे साहित्य : कैरीचे बारीक काप, ताजं खोबरं, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, लसूण, कडीपत्ता, साखर, जिरे, मोहरी, तेल आणि मीठ हे साहित्य लागेल.
advertisement
4/7
कैरीची चटणी बनविण्याची कृती : - सर्वप्रथम कैरी आणि खोबरं बारीक कापून घ्यावं. त्यानंतर मिक्सरमध्ये कैरी, खोबरं, कोथिंबीर, लसूण आणि हिरव्या मिरच्या एकत्र करून बारीक वाटून घ्यावं. त्यातच साखर सुद्धा बारीक करून घ्यावी.
advertisement
5/7
हे मिश्रण जितकं बारीक होईल तितकी चटणी चविष्ट लागते. यानंतर कढईत तेल गरम करून त्यात जिरे आणि मोहरी टाकावी.
advertisement
6/7
फोडणी तडतडू लागल्यावर कडीपत्ता घालून हलकं परतावं. त्यात चिमूटभर मीठ घालून फोडणी तयार करावी. गॅस बंद करून ही फोडणी तयार चटणीवर घालून व्यवस्थित मिसळावी.
advertisement
7/7
क्षणात तयार होणारी ही कैरीची चटणी आंबट-गोड आणि तिखट चवीमुळे जेवणाची लज्जत वाढवते. भाकरी, पोळी किंवा अगदी साध्या वरण-भातासोबतही ही चटणी अप्रतिम लागते. उन्हाळ्यात थंडावा आणि चव दोन्ही देणारी ही सोपी रेसिपी नक्की ट्राय करून बघा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/रेसिपी/
कैरीची चटणी आता बनवाच! उन्हाळ्यात जेवणासोबत चटपटीत झटका, संपूर्ण रेसिपी