TRENDING:

Weather Update : कल्याण- डोंबिवलीत हवा बदलली, थंडीला ब्रेक की उन्हाचा चटका? हवामान खात्याकडून महत्त्वाचं अपडेट

Last Updated:
मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील किमान तापमानात घट होऊन थंडी वाढण्याची शक्यता आहे, तर कमाल तापमानही स्थिर असेल, यावरून कल्याण डोंबिवलीसह इतर भागातील हवामान अंदाज काय असेल बघुयात.
advertisement
1/5
कल्याण- डोंबिवलीत हवा बदलली, थंडीला ब्रेक की उन्हाचा चटका? महत्त्वाचं अपडेट
1 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील हवामान प्रामुख्याने कोरडे आणि सूर्यप्रकाशित राहण्याचा अंदाज आहे. राज्याच्या अंतर्गत भागात किमान तापमानात पुढील 7 दिवस कोणताही मोठा बदल होणार नसल्याने थंडीचा जोर मर्यादित राहील. मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील किमान तापमानात घट होऊन थंडी वाढण्याची शक्यता आहे, तर कमाल तापमानही स्थिर असेल, यावरून कल्याण डोंबिवलीसह इतर भागातील हवामान अंदाज काय असेल बघुयात.
advertisement
2/5
कल्याण तालुक्यातील हवामान मुख्यतः कोरडे आणि अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. गेल्या दोन दिवसांपेक्षा थंडीचा जोर कमी होऊन तापमानात वाढ होईल, कमाल तापमान 31अंश सेल्सिअस, तर किमान तापमानात घट होऊन 19 अंश सेल्सिअस असेल. दुपारी उकाडा जाणवेल त्यामुळे बदलत्या वातावरणानुसार नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.
advertisement
3/5
डोंबिवली शहरातील हवामान अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता असून, कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस, तर किमान तापमानात घट होऊन 16 अंश सेल्सिअस असेल. दुपारी कडक ऊन आणि उकाडा असल्याने, बाहेर पडताना नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी.
advertisement
4/5
कल्याण-डोंबिवली ग्रामीण भागातील वातावरणात काही दिवसांपासून बदल होऊन हवामान कोरडे, स्वच्छ आणि सकाळच्या वेळी गुलाबी थंडीचे असेल. दिवसा हवामान उष्ण हवामान असून,किमान तापमान 19 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस असेल.
advertisement
5/5
फेब्रुवारीच्या पहिल्याच दिवशी बदलापूरमधील हवामानात लक्षनीय बदल होऊन सुखद आणि कोरडे राहण्याची शक्यता आहे. किमान तापमानात घट होऊन 10 अंश सेल्सिअस ते कमाल तापमान 24 अंश सेल्सिअस असून दिवसभरात कोरडे आणि हलके वारे वाहतील. शहापूर आणि मुरबाड शहरातील किमान तापमान 18 अंश सेल्सिअस ते कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस असून, हवेत सौम्य गारवा आणि कोरडे वातावरण राहील.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Kalyan Dombivli/
Weather Update : कल्याण- डोंबिवलीत हवा बदलली, थंडीला ब्रेक की उन्हाचा चटका? हवामान खात्याकडून महत्त्वाचं अपडेट
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल