TRENDING:

Ginger Benefits: हिवाळ्यात आलं खाल्ल्याने होतील ‘इतके’ फायदे, होईल अनेक गंभीर आजारापासून संरक्षण

Last Updated:
Benefits of Ginger in Marathi: आल्यात असलेल्या गुणधर्मांमुळे हिवाळ्यात आलं खाणं किंवा आल्याचं पाणी, आल्याचा चहा प्यायल्याने साथीच्या आजारांपासून ते हृदयविकांरासारख्या गंभीर आजारांना दूर ठेवता येऊ शकतं. जाणून घेऊयात हिवाळ्यात आलं खाण्याचे फायदे.
advertisement
1/7
Ginger Benefits: आलं खाल्ल्याने होतील ‘इतके’ फायदे, गंभीर आजार पळतील दूर
आलं हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक झालाय. अगदी सकाळच्या चहापासून ते रात्रीपर्यंतच्या जेवणात कुठल्या ना कुठल्या पदार्थात आल्याचा वापर दिसून येतो.
advertisement
2/7
शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर काढून शरीर आतून स्वच्छ करण्यात म्हणजेच डिटॉक्सिफिकेशन करण्यात आलं महत्त्वाची भूमिका बजावतं. टाकाऊ पदार्थ आपसूचक शरीराबाहेर पडल्याने पचनक्रिया सुधारते.त्यामुळे आलं खाल्ल्याने अपचन, बद्धकोष्ठता किंवा पोटाशी संबंधित आजारांपासून आराम मिळू शकतो.
advertisement
3/7
आल्यामध्ये जिंजरॉल आणि शोगोल सारखी संयुगे आढळतात. यासोबतच यामध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स असतात त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढायला मदत होते. त्यामुळे संक्रामित आजारांपासू रक्षण होऊ शकतं.
advertisement
4/7
सर्दी आणि खोकल्यावर सारख्या आजारांवर आलं हे गुणकारी आहे. आल्यात असलेल्या औषधी गुणधर्मांमुळे विषाणूजन्य आणि संक्रामित आजारांचा धोका टाळता येतो.
advertisement
5/7
आलं फक्त चवीपुरता मर्यादित नाहीये. आल्यात असलेल्या गुणधर्मांमुळे आलं खाणं किंवा आल्याच्या मर्यादित सेवनाने हृदयविकांरासारख्या गंभीर आजारांना दूर ठेवता येऊ शकतं. आल्यामध्ये अनेक बायोएक्टिव्ह कंपाऊंड असतात जे उच्च रक्तदाब सामान्य ठेवण्यास मदत करतात.
advertisement
6/7
आल्यात असलेल्या अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांमुळे सांधे आणि स्नायूदुखीवर आलं खाणं फायद्याचं मानलं जातं.याशिवाय विविध प्रकारच्या दुखण्यावरही आलं गुणकारी आहे.
advertisement
7/7
आलं खाल्ल्याने तणाव कमी होऊन मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. त्यामुळे जेव्हा तुमचा मूड खराब असेल किंवा तुमच्या मनावर कोणता ताण असेल तर आलं घातलेला चहा प्या. तुमचा तणाव दूर व्हायला मदत होईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Ginger Benefits: हिवाळ्यात आलं खाल्ल्याने होतील ‘इतके’ फायदे, होईल अनेक गंभीर आजारापासून संरक्षण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल