TRENDING:

Mysterious Temple : किती ज्ञानी आले पण या मंदिरातील शिवलिंग मोजू नाही शकले; प्रत्येक वेळी बदलते संख्या

Last Updated:
Mysterious Temple In India : या मंदिरातील शिवलिंगांची संख्या सतत बदलत असते. प्रत्येकवेळी मोजाल तेव्हा संख्या वेगळी येते. कधी 243, कधी 283 तर कधी त्यापेक्षाही जास्त. 
advertisement
1/7
किती ज्ञानी आले पण या मंदिरातील शिवलिंग मोजू नाही शकले; नेहमी बदलते संख्या
शंकराच्या मंदिरात शिवलिंग असतं. तसं सामान्यपणे एका मंदिरात एक शिवलिंग असतं. पण एक असं मंदिर जितकी खूप शिवलिंग आहेत, इतकी की मोजून मोजून थकाल पण अचूकपणे मोजू शकणार नाही.<span style="font-size: 20px;">  </span>
advertisement
2/7
या मंदिराची स्थापना 1865 साली नेपाळचे राजा राणा सेनापती पद्म जंग बहादूर यांनी केली होती. इथं अनेक शिवलिंगे असल्याने तो भगवान शिवाचा दरबार म्हणून ओळखला जातो.
advertisement
3/7
या मंदिरात भगवान शिवाच्या सर्व रूपांची शिवलिंगे आहेत. चंडेश्वर, सिद्धेश्वर, नागेश्वर आणि शहीद भगवान यांच्यासह भगवान शिवाच्या विविध रूपांचं प्रतिनिधित्व करणारी शिवलिंगे आहेत. ज्यामुळे ते भक्तांसाठी एक अद्भुत आणि दिव्य स्थान बनते.
advertisement
4/7
या मंदिराचे पुजारी दीपक जी महाराज यांनी लोकल18 शी बोलताना सांगितलं की, या मंदिरातील शिवलिंगांची संख्या कोणीही मोजू शकलेलं नाही. लोकांनी अनेक वेळा प्रयत्न केले आहेत, पण प्रत्येक वेळी संख्या वेगळी येते. पुजारी याला भगवान शिवाचा चमत्कार मानतात आणि म्हणतात की येथील शिवलिंगांची संख्या स्वतःहून चढ-उतार होते, जी या ठिकाणाची सर्वात मोठी खासियत आहे.
advertisement
5/7
असं मानलं जातं की जेव्हा भगवान राम अयोध्येतील वनवासातून परत येत होते, तेव्हा त्यांच्यावर रावणाच्या वधासाठी ब्रह्महत्येचे म्हणजे ब्राह्मणाची हत्या केल्याचं पाप लादलं गेलं होतं.
advertisement
6/7
तेव्हा महर्षी भारद्वाज यांनी भगवान रामांना पृथ्वीवर एक कोटी शिवलिंगे स्थापित करण्याचा आणि त्यांची योग्य पूजा करण्याचा सल्ला दिला, तरच त्यांचं ब्रह्महत्येचे पाप नष्ट होईल, असं सांगितलं.
advertisement
7/7
पापाचं प्रायश्चित्त करण्यासाठी भगवान राम यांनी या शिवलिंगांची स्थापना आणि पूजा केली. हे तेच ठिकाण. पण हे आहे कुठे? तर उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमधील शिवकुटी येथील शिवकाचारी मंदिर, जिथं भगवान रामांनी कोटेश्वर महादेवाची स्थापना केली. आजही हे ठिकाण भक्तांसाठी श्रद्धेचे आणि चमत्कारांचे केंद्र आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Mysterious Temple : किती ज्ञानी आले पण या मंदिरातील शिवलिंग मोजू नाही शकले; प्रत्येक वेळी बदलते संख्या
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल