तुला जिवे ठार मारणार म्हणून धमक्या दिल्या, पण तिने 15 महिन्यांमध्ये केले 16 एन्काउंटर; कोण आहे महिला IPS अधिकारी?
- Published by:sachin Salve
- trending desk
Last Updated:
2015मध्ये बोडो दहशतवाद्यांविरोधात मोठं ऑपरेशन राबवलं. त्यामध्ये 15 महिन्यांत 16 दहशतवादी मारले गेले.
advertisement
1/6

काही आयपीएस, आयएएस अधिकारी हे रिअल लाइफ 'सिंघम' असतात. भारतात एक अशीच महिला आयपीएस अधिकारी आहे, तिच्या नावाची दहशतवाद्यांमध्येही दहशत आहे. कारण तिने 15 महिन्यांत 16 एन्काउंटर केले आहेत. या अधिकाऱ्याच्या हिमतीचा अंदाज तुम्हाला यावरून येईल, की ती एके 47 घेऊन दहशतवादविरोधी मोहिमेत स्वतः मैदानात उतरली होती. संजुक्ता पराशर असं या अधिकाऱ्याचं नाव असून, त्या आसामच्या आयपीएस आहेत.
advertisement
2/6
15 महिन्यांत केले 16 एन्काउंटर -डीएनएच्या वृत्तानुसार, फक्त 15 महिन्यांत पराशर यांनी 16 दहशतवाद्यांना ठार केलं, तर 64 हून जास्त जणांना पकडलं. तसंच शस्त्रं व दारूगोळा जप्त केला. या भागातले दहशतवादी संजुक्ता यांच्या नावाला घाबरतात, असं म्हटलं जातं.
advertisement
3/6
संजुक्ता पराशर यांचं शिक्षण -संजुक्ता पराशर यांचा जन्म आसाममध्ये झाला. आसाममध्ये शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी दिल्लीच्या इंद्रप्रस्थ कॉलेजमधून राज्यशास्त्राची पदवी घेतली. मग त्यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून (JNU) इंटरनॅशनल रिलेशन्समध्ये मास्टर्स डिग्री घेतली. त्यानंतर अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणात एमफिल व पीएचडी केली.
advertisement
4/6
UPSC रँक -संजुक्ता यांचा भारतीय पोलीस सेवेतला (IPS) प्रवास 2006मध्ये सुरू झाला. तेव्हा त्यांनी ऑल इंडिया रँक 85 मिळवून करिअर सुरू केलं. त्यांनी आसाम-मेघालय केडर निवडलं. 2008मध्ये त्यांचं पहिलं पोस्टिंग आसाममधील माकुम इथे असिस्टंट कमांडंट म्हणून झालं होतं.
advertisement
5/6
एके 47 घेऊन उतरल्या ऑपरेशनमध्ये -लवकरच त्यांना उदलगुडीमध्ये बोडो व बांगलादेशी यांच्यातला हिंसाचार नियंत्रित करण्यासाठी तैनात करण्यात आलं. नंतर, आसामच्या सोनितपूर जिल्ह्यात पोलीस अधीक्षक (एसपी) म्हणून संजुक्ता यांनी सीआरपीएफ टीमचं नेतृत्व केलं आणि बोडो दहशतवाद्यांशी त्या थेट भिडल्या. एका ऑपरेशनमध्ये त्या स्वतः एके-47 घेऊन उतरल्या होत्या. या ऑपरेशन्सचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यात त्या टीम लीड करताना दिसत होत्या.
advertisement
6/6
टीमने 64 बोडो दहशतवाद्यांना पकडलं -दहशतवादी संघटनांकडून त्यांना जिवे मारण्याच्या धमक्या खूप वेळा मिळाल्या; पण संजुक्ता पराशर घाबरल्या नाहीत. त्यांनी 2015मध्ये बोडो दहशतवाद्यांविरोधात मोठं ऑपरेशन राबवलं. त्यामध्ये 15 महिन्यांत 16 दहशतवादी मारले गेले. त्यांच्या टीमने 64 बोडो दहशतवाद्यांना पकडलं आणि खूप शस्त्रास्त्रं व दारूगोळा जप्त केला. यापूर्वी 2014मध्ये त्यांच्या टीमने 175 दहशतवाद्यांना पकडलं होतं आणि 2013 मध्ये 172 दहशतवाद्यांना पकडलं होतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
तुला जिवे ठार मारणार म्हणून धमक्या दिल्या, पण तिने 15 महिन्यांमध्ये केले 16 एन्काउंटर; कोण आहे महिला IPS अधिकारी?