भाजी नेहमीचीच, पण सूप लय भारी! 5 दिवस प्या आणि चमत्कार पाहा
- Published by:Isha Jagtap
Last Updated:
हवामान बदलामुळे होणाऱ्या आजारांपासून वाचण्यासाठी या सूपचं प्रामुख्याने सेवन केलं जातं. त्यामुळे अनेक आजारांपासून आपलं शरीर सुरक्षित राहतं.
advertisement
1/5

धावपळीचं जीवन आणि त्यात हवामानातील बदल आजकाल प्रत्येकालाच झेपेनासं झालंय. जिथे पाहावं तिथे घरात एकातरी सदस्याला ताप, सर्दी किंवा खोकला आहेच. अशात गोळ्या, औषधं तरी किती खाणार? त्यामुळे नंतर उपचार करण्यापेक्षा आधीच स्वतःची काळजी घ्या. त्यासाठी तुम्हाला बाजारात सहज मिळणाऱ्या कोबीचा फार फायदा होईल. मात्र कोबीची भाजी खायची नाही, तर तिचं सूप बनवून प्यायचं.
advertisement
2/5
कोबीमध्ये कॅल्शियम, पोटॅशियम आणि ए, सी, केसह अनेक जीवनसत्त्व असतात. कोबीची भाजी, कोबीची भजी, असे विविध पदार्थ आपण खातो. मात्र कोबीचं सूप सर्वाधिक गुणकारी ठरतं. हे सूप बनवण्यासाठी सर्वात आधी कोबीचे लहान लहान तुकडे करावे. एका भांड्यात 6 ते 7 कप पाणी घेऊन त्यात हे तुकडे शिजवावे. त्यात थोडा कांदा, चवीपुरतं काळं मीठ आणि काळा मसाला घालावा. सूप काहीसं जाडसर होण्यासाठी त्यात अर्धा चमचा मध घाला. आता मिश्रण छान शिजूद्या. व्यवस्थित शिजल्यानंतर भांड गॅसवरून खाली उतरवा. सूप कोमट झाल्यानंतर ते गाळून प्या. 5 दिवस हे सूप प्यायल्यानंतर शरिराला काय चमत्कारिक उपयोग होतात, पाहूया. मात्र लक्षात घ्या, हे सूप केवळ तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच घ्यावं.
advertisement
3/5
तज्ज्ञांच्या मते, कोबीचं सूप प्यायल्यास शरिरातील अनावश्यक घटक नैसर्गिकरीत्या बाहेर फेकले जातात. या सूपमध्ये अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. ज्यामुळे यकृत स्वच्छ होतं आणि त्यात कोणतेही अनावश्यक घटक उरत नाहीत.
advertisement
4/5
हे सूप प्यायल्यास शरिराची रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते. हवामान बदलामुळे होणाऱ्या आजारांपासून वाचण्यासाठी या सूपचं प्रामुख्याने सेवन केलं जातं. त्यामुळे अनेक आजारांपासून आपलं शरीर सुरक्षित राहतं.
advertisement
5/5
पोटाच्या विकारांपासून मुक्ती देण्यातही हे सूप महत्त्वाची भूमिका बजावतं. या सूपमध्ये फायबरसह असे अनेक पोषक तत्त्व असतात, ज्यामुळे आतड्या स्वच्छ होण्यास मदत मिळते. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, नियमितपणे हे सूप प्यायल्यास पचनक्रिया सुधारते. ज्यामुळे अपचन आणि बद्धकोष्ठता होत नाही. वजन कमी करण्यासही हे सूप उपयुक्त ठरतं. या सूपमुळे भूक कमी लागते. शिवाय यात कॅलरीजचं प्रमाण अधिक असतं. म्हणून वजन नियंत्रणात राहतं.