TRENDING:

Foods for whiten Teeth: दात पिवळे पडलेत, खा ‘हे’ पदार्थ, मोत्यांसारखे चमकतील दात, करावी लागणार नाही फार मेहनत

Last Updated:
6 Healthy foods for whiten teethes: चांगलं हास्य आणि पांढरे शुभ्र दात तुमच्या व्यक्तीमत्त्वात भर पाडतात. जसं प्रत्येक व्यक्तीच्या त्वचेचा रंग हा वेगळा असतो तसंच प्रत्येकाच्या दातांचा रंग ही वेगळा असतो. काहीचे दात अगदी मोत्यासारखे असतात तर काहींचे पिवळसर सफेद, मात्र असं असलं तरीही खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे अनेकांचे दात पिवळे पडू शकतात. तर काहींच्या दातांवर डाग येतात. त्यामुळे तुम्हाला तुमच्या दातांना नैसर्गिकरित्या स्वच्छ आणि चमकदार ठेवायचं आहे तर हे 7 पदार्थ तुमच्या फायद्याचे ठरू शकतात.
advertisement
1/7
Foods for whiten Teeth: दात पिवळे पडलेत, खा ‘हे’ पदार्थ, मोत्यांसारखे चमकतील दात
मसालेदार अन्न, कृत्रिम रंग असलेले पदार्थ किंवा चहा, कॉफीसह, गडद रंग असलेली पेयं ही एकूणच दातांच्या आरोग्यासाठी हानिकारक आहेत. असे पदार्थ खाल्ल्यानंतर दात नीट स्वच्छ केले नाहीत तर ते पिवळे पडू शकतात. त्यामुळे काहीही खाल्ल्यानंतर किंवा प्यायल्यानंतर खळखळून चूळ भरण्याच्या सल्ला डेन्टिस्ट देतात.
advertisement
2/7
सफरचंदात एक नैसर्गिक आम्लयुक्त पदार्थ असतो जो तोंडात लाळेचे उत्पादन वाढवतो. यामुळे तोंडातील आम्ल निष्क्रिय होतं आणि दात आपोआप स्वच्छ होतात.
advertisement
3/7
गोड आणि आंबट फळे देखील दातांना चमक देण्यास फायदेशीर ठरतात. संत्री, किवी किंवा लिंबूवर्गीय फळांमध्ये लाळेचं उत्पादन वाढवण्याची क्षमता असते. यामुळे दात नैसर्गिकरित्या स्वच्छ व्हायला मदत होते.
advertisement
4/7
गाजराला नैसर्गिक टूथब्रश असं म्हटलं जातं. गाजर चावून खाल्ल्यामुळे दातांमध्ये लपलेले बॅक्टेरिया आणि दातांमध्ये अडकलेले अन्न कण निघून जातात. त्यामुळे दात स्वच्छ राहून ते किडण्याची भीती टळते.
advertisement
5/7
काजू- बदामांमध्ये लाळेचं उत्पादन वाढवण्याची क्षमता देखील असते. काजू-बदाम खाल्ल्यामुळे तोंड लाळेने भरलेले राहतं. त्यामुळे दातांना नैसर्गिकरित्या चमक यायला मदत होते.
advertisement
6/7
स्ट्रॉबेरीमध्ये मॅलिक ॲसिड असतं जे दातांवर साचलेले डाग दूर करायला मदत करतं. त्यामुळे दात स्वच्छ राहायला मदत होते.
advertisement
7/7
एका अभ्यासात असं आढळून आलं आहे की, अननसात आढळणारे ब्रोमेलेन एन्झाईम दातांच्या पृष्ठभागावरील डाग काढून टाकण्यास मदत करतात आणि हिरड्यांमधील जळजळ दूर करायला मदत करतात. त्यामुळे अननस खाणं हे दातांच्या आरोग्यासाठी फायद्याचं मानलं जातं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Foods for whiten Teeth: दात पिवळे पडलेत, खा ‘हे’ पदार्थ, मोत्यांसारखे चमकतील दात, करावी लागणार नाही फार मेहनत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल