Airport Tips : विमानतळावर 'या' साध्या चुका टाळा, अन्यथा मिळणार नाही एंट्री आणि मिस होईल तुमची फ्लाइट!
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
How to avoid missing a flight : अनेकदा प्रवासाचा उत्साह किंवा घाई यामुळे लोक विमानतळावर काही सामान्य चुका करतात, ज्यामुळे त्यांची महत्त्वाची 'फ्लाइट' हुकते. काही लहान चुका तुम्हाला महाग पडू शकतात. तुमचा प्रवास सुखकर व्हावा आणि विमानाने उड्डाण करण्यापूर्वी कोणताही अडथळा येऊ नये म्हणून, विमानतळावर कोणती काळजी घ्यावी आणि कोणत्या चुका टाळाव्यात, याबद्दलची माहिती घेऊया.
advertisement
1/9

विमानतळावर वेळेत पोहोचा : अनेकांना वाटते की उड्डाणापूर्वी फक्त एक तास आधी पोहोचले तरी चालेल, पण असा विचार करून बऱ्याचदा फ्लाइट मिस होते. त्यामुळे, देशांतर्गत फ्लाइटसाठी किमान 2 तास आधी आणि आंतरराष्ट्रीय फ्लाइटसाठी किमान ३ तास आधी विमानतळावर पोहोचा. वाहतूक, पार्किंग आणि सिक्युरिटी तपासणीमध्ये बराच वेळ जाऊ शकतो. उशीर झाल्यास गेट तुमच्यासमोर बंद होऊ शकते.
advertisement
2/9
सुरक्षा तपासणीनंतर गेटकडे लक्ष द्या : काही प्रवाशांना वाटते की, एकदा सिक्युरिटी चेक पूर्ण झाले की आपले काम संपले. पण गेटपर्यंत पोहोचायला उशीर झाल्यास फ्लाइट तुमच्या डोळ्यासमोरून निघून जाईल. एअरलाइन्स साधारणपणे उड्डाणाच्या 20 ते 25 मिनिटे आधी गेट बंद करतात. त्यामुळे आधी गेटवर पोहोचा आणि मगच आरामात कॉफी किंवा खरेदीचा आनंद घ्या.
advertisement
3/9
बोर्डिंग गेट सतत तपासा : विमानतळावर अनेकवेळा गेट क्रमांक बदलत राहतात. तुम्ही फोनमध्ये व्यस्त असाल किंवा कॅफेमध्ये बसला असाल, तर गेट बदलल्याची सूचना तुमच्याकडून सुटू शकते. यामुळे तुम्ही चुकीच्या गेटवर पोहोचू शकता आणि तुमची फ्लाइट निघून जाऊ शकते. त्यामुळे एअरलाइन ॲप आणि विमानतळ डिस्प्ले स्क्रीन या दोन्हीवर सतत लक्ष ठेवा.
advertisement
4/9
आवश्यक कागदपत्रे तपासा : एबीपी न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, तुमच्याकडे योग्य कागदपत्रे नसल्यास, गेटवरच तुम्हाला थांबवले जाऊ शकते. पासपोर्टची मुदत संपलेली नसावी, तसेच तुमचे नाव तिकीट आणि इतर कागदपत्रांमध्ये एकसारखे असल्याची खात्री करा.
advertisement
5/9
आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी पासपोर्टची वैधता : आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी तुमचा पासपोर्ट किमान पुढील 6 महिने वैध असणे आवश्यक आहे. जर तुमच्या पासपोर्टची मुदत जवळ येत असेल, तर तुमची बोर्डिंग त्वरित रद्द होऊ शकते.
advertisement
6/9
बॅगच्या वजनाचे आणि आकाराचे नियम पाळा : प्रवासी अनेकदा त्यांच्या बॅगमध्ये जास्त वजन भरतात किंवा अशा वस्तू ठेवतात, ज्यांची परवानगी नसते. तुमचे हँडबॅग निश्चित केलेल्या वजन आणि आकारापेक्षा मोठे असल्यास किंवा त्यात प्रतिबंधित वस्तू असल्यास तुम्हाला गेटवर अडवले जाऊ शकते. त्यामुळे प्रत्येक उड्डाणापूर्वी बॅगचे वजन आणि आकार एकदा तपासा.
advertisement
7/9
आरोग्य आणि वर्तणूक : तुम्ही नशेत असाल किंवा तुम्ही खूप अस्वस्थ, आजारी दिसत असाल तर एअरलाइन कर्मचारी तुम्हाला विमानात चढण्यास नकार देऊ शकतात. आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये हे नियम अधिक कठोर असतात. म्हणून प्रवासापूर्वी तुमच्या आरोग्याची काळजी घ्या आणि विमानतळावर सभ्य वर्तन ठेवा.
advertisement
8/9
विमान प्रवास हा वेळेच्या व्यवस्थापनावर अवलंबून असतो. वेळेवर पोहोचणे, आवश्यक नियमांचे पालन करणे आणि सतत जागरूक राहणे यामुळे तुमचा प्रवास निश्चितच तणावमुक्त आणि आनंददायी होईल.
advertisement
9/9
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Airport Tips : विमानतळावर 'या' साध्या चुका टाळा, अन्यथा मिळणार नाही एंट्री आणि मिस होईल तुमची फ्लाइट!