TRENDING:

Buttermilk Benefits : चहाऐवजी सकाळी रिकाम्या पोटी प्या ताक, होतील हे जबरदस्त फायदे

Last Updated:
उन्हाळा सुरु आहे. उष्णता टाळण्यासाठी लोक अनेक प्रकारची थंड पेये पितात. मात्र यातील सर्वात फायदेशीर मानलं जात ते ताक. ताक प्यायल्याने शरीराला थंडावा तर मिळतोच. पण हे पोटाच्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर असते. आज आम्ही तुम्हाला सकाळी रिकाम्या पोटी ताक पिण्याचे फायदे सांगणार आहोत.
advertisement
1/7
चहाऐवजी सकाळी रिकाम्या पोटी प्या ताक, होतील हे जबरदस्त फायदे
उन्हाळ्यात कडक उन्हापासून आराम मिळवण्यासाठी लोक आईस्क्रीम आणि कोल्ड ड्रिंक्सचे सेवन करतात. परंतु काही शारीरिक व्याधींनी ग्रस्त असलेल्यांनी अशा पदार्थाचे सेवन टाळावे. याउलट, उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी ताक हे सर्वात फायदेशीर पेय मानले गेले आहे.
advertisement
2/7
विशेषतः ज्या लोकांना पोटाशी संबंधित समस्या आहेत ते लोक सकाळी नाश्त्यात ताक पिऊ शकतात. सकाळी रिकाम्या पोटी ताक प्यायल्याने बद्धकोष्ठता, अपचन, गॅस यांसारख्या पोटाच्या समस्यांपासून सुटका मिळते. ताक तुमची पचनक्रिया सुधारते.
advertisement
3/7
ताक प्यायल्याने हाडे मजबूत होतात. ताकामध्ये भरपूर पोषक असतात. यामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन बी12, झिंक, रिबोफ्लेविन आणि प्रथिने मुबलक प्रमाणात असते. ताक प्यायल्याने हाडे मजबूत होतात. कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते.
advertisement
4/7
यासोबतच वजन कमी करण्यासाठी आणि पोटासाठीही ताक फायदेशीर आहे. आयुर्वेदानुसार ताकाचा शीतल प्रभाव असतो. त्यामुळे उन्हाळ्यात ताक पिणे खूपच फायदेशीर ठरू शकते.
advertisement
5/7
ताक कधी प्यावे? : आयुर्वेदानुसार ताक नेहमी दिवसा प्यायले पाहिजे. संध्याकाळी किंवा रात्री ताक पिणे टाळावे. याशिवाय ज्या लोकांना पोटाशी संबंधित आजार आहेत. लोक सकाळी ताक पिऊ शकतात. आयुर्वेदानुसार सकाळी रिकाम्या पोटी ताक सेवन केले जाऊ शकते.
advertisement
6/7
सकाळी रिकाम्या पोटी ताक प्यायल्याने तुम्ही दिवसभर ऊर्जावान राहू शकता. ताक प्यायल्याने शरीरातील पाण्याची कमतरताही दूर होते. परंतु तुम्हाला कोणताही गंभीर आजार असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ताक प्यावे.
advertisement
7/7
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Buttermilk Benefits : चहाऐवजी सकाळी रिकाम्या पोटी प्या ताक, होतील हे जबरदस्त फायदे
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल