Black Grapes Benefits: आंबटगोड द्राक्षं खायला आवडतात? मग खा काळी द्राक्षं, आरोग्याला होतील अनेक फायदे
- Published by:Tushar Shete
Last Updated:
Black grapes Health Benefits in Marathi: आंबटगोड द्राक्षं लहानांपासून मोठ्यांना आवडतात. द्राक्षांमध्ये असलेल्या पोषकतत्त्वामुळे ती खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात. अनेक वर्षांपासून हिरवी लांब, टपोरी हिरवी द्राक्षं खाण्याकडे अनेकांचा कल होता. मात्र गेल्या काहीवर्षांपासून बाजारात काळी आणि लाल द्राक्षं सुद्धा उपलब्ध आहेत. हिरव्या द्राक्षांच्या तुलनने ही दोन्ही द्राक्षं महाग जरी असली तरी काळ्या द्राक्षांमध्ये इतर द्राक्षांच्या तुलनेत पोषकतत्वांचं प्रमाण अधिक असल्याने काळी द्राक्ष खाणं आरोग्यासाठी फायद्याचं मानलं गेलंय. जाणून घेऊयात काळी द्राक्षं खाण्याचे फायदे.
advertisement
1/7

हिरव्या आणि लाल द्राक्षांपेक्षा काळी द्राक्षंही 10 पट अधिक जास्त चविष्ट आणि पौष्टिक असतात. याशिवाय काळी द्राक्षं हा पोषकतत्वांचा खजीना मानला जातो. दररोज काळी द्राक्षं आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते.
advertisement
2/7
काळ्या द्राक्षांमध्ये व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि फ्लेव्होनॉइड्स भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढून संक्रामित आजारांशी लढण्याची क्षमता वाढते. त्यामुळे आजारपणांचा धोका टाळता येतो.
advertisement
3/7
काळ्या द्राक्षांमध्ये फायबर्स असते हे जास्त प्रमाणात आढळून येतात. ज्यामुळे पचनक्रिया सुधारून गॅसेस, अपचन, बद्धकोष्ठतेच्या समस्यांपासून आराम मिळतो. नियमितपणे काळी द्राक्षे खाल्ल्याने पोटाचे आरोग्य सुधारते.
advertisement
4/7
काळ्या द्राक्षांमध्ये असलेलं व्हिटॅमिन ए आणि अँटीऑक्सिडंट्स डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतं. काळ्या द्राक्षांच्या सेवनामुळे दृष्टी सुधारते. याशिवाय डोळ्याचं संक्रमण आणि विविध नेत्रविकारांचा धोका टळतो.
advertisement
5/7
काळ्या द्राक्षांमध्ये रेझवेराट्रोल नावाचं संयुग असतं. जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायद्याचं मानलं गेलंय. यामुळे रक्तप्रवाह सुधारून रक्तातलं कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहून हृदयरोगाचा धोका टाळता होतो.
advertisement
6/7
काळी द्राक्षं ही मूत्रपिंड आणि यकृताच्या आरोग्यासाठीही फायद्याची ठरतात. या द्राक्षांमध्ये असलेल्या डिटॉक्सिफायिंग गुणधर्मांमुळे मूत्रपिंड आणि यकृत आतून स्वच्छ व्हायला मदत होते.
advertisement
7/7
त्वचेच्या आरोग्यासाठीही काळी द्राक्षं फायद्याची ठरतात. काळ्या द्राक्षांमध्ये असलेल्या अँटीऑक्सिडंट्समुळे त्वचेला ओलावा मिळून त्वचा तजेलदार राहायला मदत होते. यामुळे त्वचेवरच्या सुरकुत्याही कमी व्हायला मदत होते. काळ्या द्राक्षाचा रस त्वचेवर लावल्याने ताजेपणा आणि चमक येते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Black Grapes Benefits: आंबटगोड द्राक्षं खायला आवडतात? मग खा काळी द्राक्षं, आरोग्याला होतील अनेक फायदे