बेस्ट सेलिब्रिटी कपल जय-माहीचा Divorce! सगळं चांगलं असूनही घटस्फोट होण्याची कारणं काय?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Jay Bhanushali Mahhi Vij Divorce : जय-माहीसारखे कपल, बाहेरून पाहिलं तर त्यांचं आयुष्य अगदी परफेक्ट वाटतं. तरीसुद्धा अचानक घटस्फोट हा शब्द समोर येतो आणि सगळेच आश्चर्यचकित होतात. मग प्रश्न पडतो सगळं चांगलं असतानाही घटस्फोट का होतात?
advertisement
1/9

अभिनेता जय आणि अभिनेत्री माही हे कपल म्हणजे बेस्ट सेलिब्रिटी कपल्सपैकी एक. ज्यांची जोडी पाहून अनेकांना कौतुक वाटतं. कित्येक लोक या सेलिब्रिटी कपलचे चाहते. पण आता त्यांनी घटस्फोट घेतला आहे. घटस्फोटाबाबत सांगतानाही त्यांनी आपण एकमेकांसाठी नेहमी असू, एकमेकांचे मित्र म्हणून राहू असं म्हटलं आहे. असं सगळं चांगलं असताना या कपलमध्ये घटस्फोट का झाला? यामागील कारण काय? हे या कपलने तसं स्पष्ट सांगितलं नाही. पण कपलमध्ये काहीच बिघडलेलं नसताना घटस्फोट का होतात यामागे काही कारणं आहेत.
advertisement
2/9
संवाद बंद झाला की नातं थांबतं : अनेक जोडप्यांमध्ये मोठं भांडण नसतं, पण खरा संवादही नसतो. रोजचं बोलणं हे फक्त कामापुरतं मर्यादित राहतं. मुलं, घरखर्च, ऑफिस, जबाबदाऱ्या. मनातलं दुखणं, अपेक्षा, अस्वस्थता मात्र बोलली जात नाही. हळूहळू एक अदृश्य अंतर तयार होतं आणि नातं आतून पोकळ होत जातं.
advertisement
3/9
समजूतदारपणा आणि आनंद यात फरक : काही लोक नात्यात सतत एडजस्ट करत राहतात. आपण समजूतदार असायला हवं, घर टिकायला हवं या विचारात स्वतःच्या भावना बाजूला ठेवतात. पण समजूतदार असणं म्हणजे आनंदी असणं नसतं. वर्षानुवर्षे दाबलेलं दुःख एक दिवस निर्णयाचं रूप घेतं.
advertisement
4/9
भावनिक संबंध हरवतो : लग्नाच्या सुरुवातीला असलेली आपुलकी, जिव्हाळा, काळजी घेणं हळूहळू कमी होत जाते. बोलणं होतं, पण मन जुळत नाही. सोबत राहणं होतं, पण जवळीक नसते. हे नातं तुटत नाही, पण जिवंतही राहत नाही.
advertisement
5/9
दोघांची वाढ वेगवेगळ्या दिशेने होते : एक जोडीदार मानसिक, भावनिक किंवा व्यावसायिकदृष्ट्या पुढे जातो, तर दुसरा तिथेच थांबतो. विचार, प्राधान्यं, आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. हळूहळू दोघंही एकमेकांसाठी अनोळखी बनतात.
advertisement
6/9
अपेक्षा बदलतात, पण बोलल्या जात नाहीत : लग्नानंतर माणूस बदलतो, अनुभव वाढतात, अपेक्षाही बदलतात. पण या बदलांवर चर्चा होत नाही. तो किंवा ती आपोआप समजून घेईल या भ्रमात अनेक गोष्टी मनात साठत जातात. एक दिवस या साठलेल्या अपेक्षा आणि निराशा फुटतात.
advertisement
7/9
आदर आहे, पण जवळीक नाही : काही नात्यांमध्ये भांडण नाही, अपमान नाही, जबाबदारी आहे, पण प्रेम, आकर्षण, इच्छा, इंटिमेसी नाही. नातं हळूहळू पति-पत्नी ऐवजी रूममेट्ससारखं वाटू लागतं.
advertisement
8/9
समाजापेक्षा स्वतःला महत्त्व मिळायला लागलं : पूर्वी लोक नातं टिकवायचे कारण "समाज काय म्हणेल", हे होतं. आज मात्र प्रश्न बदललाय, "मी या नात्यात खरंच आनंदी आहे का?" स्वतःच्या मानसिक आरोग्याला महत्त्व दिलं जाऊ लागलं आहे, आणि त्यामुळेच काही नाती तुटतात.
advertisement
9/9
घटस्फोट हा अचानक निर्णय नसतो : बहुतेक घटस्फोट एका दिवसात होत नाहीत, एका भांडणामुळे होत नाहीत. ते अनेक प्रयत्न, अनेक गप्पा, अनेक शांत सहनशीलतेनंतर घेतलेले निर्णय असतात. तो राग नसतो, तर थकवा असतो. घटस्फोट होतो कारण लोक वाईट असतात असं नाही. घटस्फोट होतो कारण दोन चांगली माणसं एकमेकांसाठी योग्य राहात नाहीत. कधी कधी नातं टिकवणं हीच हिंमत नसते, तर नात्यातून बाहेर पडणं ही स्वतःसाठी घेतलेली गरजेची निवड असते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
बेस्ट सेलिब्रिटी कपल जय-माहीचा Divorce! सगळं चांगलं असूनही घटस्फोट होण्याची कारणं काय?