स्फोटक ओपनरचं पुनरागमन
न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने बुधवारी 7 जानेवारी रोजी आपल्या अधिकृत स्क्वाडची घोषणा केली आहे. या संघाचे नेतृत्व फिरकीपटू मिचेल सँटनरकडे सोपवण्यात आलं आहे, जो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतो. या संघात फिन ॲलेनसारख्या स्फोटक ओपनरचं पुनरागमन झालं असून, त्याने यापूर्वीअवघ्या 34 बॉलमध्ये शतक झळकावत 19 सिक्स मारण्याचा जागतिक रेकॉर्ड केला होता. टीम इंडियाविरुद्धच्या 5 मॅचच्या टी-ट्वेंटी सीरीजनंतर न्यूझीलंड आपला वर्ल्ड कप प्रवास सुरू करेल.
advertisement
न्यूझीलंडचे सामने कधी?
ग्रुप D मध्ये स्थान मिळालेला न्यूझीलंडचा संघ 8 फेब्रुवारी रोजी चेन्नईत अफगाणिस्तानविरुद्ध आपला पहिला सामना खेळणार आहे. यानंतर 10 फेब्रुवारीला यूएई, 14 फेब्रुवारीला दक्षिण आफ्रिका आणि 17 फेब्रुवारीला कॅनडाविरुद्ध न्यूझीलंडचा सामना होतील. सध्या संघातील लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री आणि स्वतः सँटनर हे काही खेळाडू दुखापतींशी झुंज देत असले, तरी बोर्डाने ते स्पर्धेपूर्वी पूर्णपणे फिट होतील असा विश्वास व्यक्त केला आहे.
न्यूझीलंडचा पूर्ण स्क्वाड : मिचेल सँटनर (कर्णधार), फिन ॲलेन, मायकल ब्रेसवेल, मार्क चॅपमॅन, डेव्हॉन कॉन्वे, जॅकब डफी, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, डॅरिल मिचेल, ॲडम मिल्ने, जेम्स नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, टिम सीफर्ट, ईश सोढी.
