आचार्य चाणक्य यांची पत्नी कोण होती, तिचं नाव काय?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Chanakya niti in marathi : आचार्य चाणक्य यांनी वैवाहिक आयुष्याबाबतही सल्ले दिले आहेत. कित्येक कपल त्यांची चाणक्यनीती फॉलो करत असतील. पण आचार्य चाणक्य यांची पत्नी कोण होती माहिती आहे का?
advertisement
1/7

महिला-पुरुषांचं नातं, पती-पत्नी, प्रेम, वैवाहिक आयुष्य याबाबत आचार्य चाणक्य यांनी बरंच काही सांगितलं आहे. त्यांच्या चाणक्यनीतीत याबाबत माहिती दिली आहे. प्रेम असो वा वैवाहिक आयुष्य याबाबत इतकी माहिती देणारे आचार्य चाणक्य यांची पत्नी कोण होती, तिचं नाव काय होतं? माहिती आहे का?
advertisement
2/7
मुद्राराक्षस, बृहत्कथाकोश, वायुपुराण, मत्स्यपुराण, विष्णुपुराण, बौद्ध ग्रंथ महावंश, जैन पुराण यामध्ये आचार्य चाणक्य यांचा उल्लेख मिळतो. आचार्य चाणक्य यांचं आयुष्य, राजकारण, शिक्षा, धर्म या विचारांवर आधारित होतं. त्यांनी आपल्या आयुष्य राज्याच्या हितासाठी वापरलं.
advertisement
3/7
थॉमस आर. ट्रॉटमॅनसारखे आधुनिक विद्वान चाणक्य यांचं जीवन सांस्कृतिक आणि सामाजिक संदर्भ समजून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चाणक्य यांनी एका ब्राह्मण महिलेशी लग्न केलं. पण नंतर गरीब परिस्थितीमुळे अपमान झाल्याने त्यांनी राजकीय मार्ग स्वीकारला.
advertisement
4/7
अर्थशास्त्र किंवा मुद्राराक्षससारख्या ग्रंथांमध्ये त्यांच्या पत्नीचा काही स्पष्ट उल्लेख नाही. पण बृहत्कथाकोशानुसार त्यांचं पत्नीचं नाव यशोमती होतं. तर अनेक इतिहासकारांच्या मते, चाणक्य यांचं लग्न झालं नव्हतं. वैदिक संस्कृतीनुसार चाणक्य यांनी ब्रह्मचर्य स्वीकारलं होतं.
advertisement
5/7
एकंदर काय तर चाणक्य यांचं लग्न झालेलं की नाही यावर इतिहासकारांचं एकमत नाही. पण बृहत्कथाकोश आणि ट्रॉटमॅनसारख्या विद्वानांच्या साहित्यांमध्ये चाणक्य विवाहित असल्याचा उल्लेख आहे.
advertisement
6/7
अशाप्रकारे चाणक्य यांच्या वैवाहिक आयुष्याबाबत ऐतिहासिक आणि साहित्यिक स्रोतांमध्ये वेगवेगळी माहिती मिळते. ज्याच्यामार्फत स्पष्ट निष्कर्ष काढणं कठीण आहे.
advertisement
7/7
सूचना : हा लेख क्वोरासारखी वेबसाईट आणि इंटरनेटवर मिळालेल्या माहितीवर आधारित आहे. न्यूज18मराठीने फक्त माहितीसाठी दिली आहे.