TRENDING:

Kitchen Tips : घरी का बनत नाही हॉटेलसारखा फ्राइड राइस, शेफ रणवीरने सांगितली नेमकी चूक कुठे होते

Last Updated:
Kitchen Tips In Marathi : हॉटेलसारखा फ्राइड राइस घरी का बनत नाही, अशी तक्रार अनेकांची असते. यामागील नेमकं कारण शेफ रणवीर बरारने सांगितलं आहे.
advertisement
1/5
घरी का बनत नाही हॉटेलसारखा फ्राइड राइस, शेफ रणवीरने सांगितली नेमकी चूक कुठे होते
तवा पुलाव, फ्राइड राइस भाताचे हे प्रकार, जे शिजलेला तांदूळ म्हणजे भातापासून बनवले जातात. हॉटेलमध्ये तुम्ही पाहाल तर फ्राइड राइस एकदम मोकळा असतो. पण तोच घरी बनवला तर तितका मोकळा होत नाही.
advertisement
2/5
तांदूळ चांगल्या क्वालिटीचा वापरला आहे, पाणीही बेताने घातलं मग नेमका राइस फसतो कुठे, चूक कुठे होते? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. शेफ रणवीरने नेमकी चूक कुठे होते ते सांगितलं आहे.
advertisement
3/5
शेफ रणवीरने सांगितल्यानुसार भात जेव्हा थंड होतो तेव्हा तो स्ट्रक्चर पकडतो. त्यामुळे कोणताही टोस्ट राइस हा थंड भातापासूनच बनवावा.
advertisement
4/5
आता थंड भात म्हणजे काय तर उरलेला किंवा शिळा भात. म्हणजे फ्राइड राइससासठी ताजा बनवलेला भात वापरू नये, कारण तो नरम असतो.
advertisement
5/5
शिळं खायचं नाही, ताजं खायचं म्हणून अनेक जण अगदी भातही ताजा लावतात, फ्राइड राइससाठीही. इथेच अनेक जण चूकत आहेत. आता एकदा शिळ्या भातापासून फ्राइड राइस बनवून पाहा आणि फरक आम्हाला नक्की सांगा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Kitchen Tips : घरी का बनत नाही हॉटेलसारखा फ्राइड राइस, शेफ रणवीरने सांगितली नेमकी चूक कुठे होते
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल