TRENDING:

Curd Chicken : चिकनला दही का लावू नये, काय होतो परिणाम?

Last Updated:
Curd Chicken Side Effects : चिकनला मॅरिनेट करताना दही लावणं हे अनेकांसाठी सामान्य झालं आहे. पण तरी चिकन आणि दही एकत्र खाऊ नये असं सांगितलं जातं, यामागील कारण काय?
advertisement
1/5
Curd Chicken : चिकनला दही का लावू नये, काय होतो परिणाम?
चिकन बनवण्याआधी बहुतेक लोक ते मॅरिनेट करतात आणि त्यावेळी दही वापरतात. बिर्याणी, तंदुरी चिकन, मुघलाई करी अशा अनेक पदार्थांमध्ये दही मॅरिनेशनसाठी वापरलं जातं. दही चिकन म्हणून दह्यातच चिकन बनवलं जातं. मात्र चिकन आणि दही एकत्र खाऊ नये, असं सांगितलं जातं. असा सल्ला डॉक्टर, आयुर्वेद तज्ज्ञ आणि काही आहारतज्ज्ञ देतात. (फोटो : AI Generated)
advertisement
2/5
अनेक वेळा दही वापरताना चुकीच्या पद्धतीने मॅरिनेशन केलं जातं. फार आंबट दही किंवा खूप जास्त दही वापरल्यास चिकन शिजताना पाणी जास्त सुटतं, चिकन रबरसारखे कडक होतं,  मूळ मसाल्याची चव दबली जाते म्हणूनच काही शेफ आणि घरगुती स्वयंपाक करणारे लोक दही न वापरण्याचा सल्ला देतात.
advertisement
3/5
आयुर्वेदानुसार दही आणि मांस हे काही परिस्थितीत विरुद्ध आहार मानले जातात. दही हे आंबट, जड आणि शीत गुणधर्माचे असतं, तर चिकन उष्ण आणि जड असते. ही दोन्ही एकत्र आल्यास पचनसंस्थेवर ताण पडतो. विशेषतः रात्रीच्या वेळी दही-चिकन एकत्र खाल्ल्यास अपचन, गॅस, आम्लपित्त यासारख्या समस्या वाढू शकतात. (फोटो : AI Generated)
advertisement
4/5
दह्यात लॅक्टिक अ‍ॅसिड असतं. हे अ‍ॅसिड चिकनच्या प्रोटीनवर परिणाम करतं. जर दही फार आंबट असेल किंवा चिकन जास्त वेळ दह्यात मॅरिनेट करून ठेवलं असेल तर चिकन नीट पचत नाही. पोट फुगणं, जडपणा जाणवतो काही लोकांना जुलाब किंवा अ‍ॅसिडिटी होऊ शकते.  (फोटो : AI Generated)
advertisement
5/5
काही लोकांना दही आणि मांस एकत्र खाल्ल्याने त्वचेवर खाज, पुरळ, अ‍ॅलर्जीची लक्षणं दिसून येतात. विशेषतः ज्यांना आधीपासूनच दूध-दुग्धजन्य पदार्थ चालत नाहीत, त्यांनी दही लावलेलं चिकन टाळणं फायदेशीर ठरते. संवेदनशील पचनसंस्था असलेल्या लोकांनी दही लावलेलं चिकन टाळावं, असं आहारतज्ज्ञ सुचवतात. (फोटो : AI Generated)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Curd Chicken : चिकनला दही का लावू नये, काय होतो परिणाम?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल