TRENDING:

Cucumber Curd : दह्यात काकडी टाकून का खाऊ नये; कोशिंबीर किंवा रायता खाल्ल्याने काय होतं?

Last Updated:
Cucumber And Curd Combination : दह्यात काकडी टाकून त्याची कोथिंबीर किंवा रायतं बनवलं जातं. अनेकांना हे हेल्दी वाटतं. पण आयुर्वेदानुसार हा विरुद्ध आहार आहे.
advertisement
1/5
दह्यात काकडी टाकून का खाऊ नये; कोशिंबीर किंवा रायता खाल्ल्याने काय होतं?
पंचपक्वान किंवा ताटभर जेवण किंवा भारतीय जेवणाची थाळी म्हटली की त्यात कोथिंबीर किंवा रायता आलंच. कोथिंबीर, रायता भारतीय आहाराचा अविभाज्य भाग. काकडी आणि दही दोन्ही पौष्टीक पदार्थ. त्यामुळे ते एकत्र करून खाल्ले जातात. पण आयुर्वेदानुसार हे दोन्ही पदार्थ एकत्र चुकूनही खाऊ नयेत.
advertisement
2/5
आयुर्वेदानुसार प्रत्येक अन्न पदार्थाचा गुणधर्म, ऊर्जा आणि पचनानंतरचा परिणाम वेगळा असतो. जेव्हा दोन पदार्थांचे गुणधर्म एकमेकांच्या विरोधात असतात, तेव्हा पाचन अग्नी मंदावते. यामुळे आम म्हणजे विषारी घटक तयार होण्याची शक्यता वाढते.  परिणामी गॅस, सुज, पोटदुखी, अपचन आणि दीर्घकाळात रोग उद्भवू शकतात.
advertisement
3/5
दही हे थंड, जड आणि उष्णतेला विरोध करणारा पदार्थ आहे, तर काकडी ही पाण्याची आणि थंड प्रकृती आहे. या दोघांचा एकत्र सेवन पचायला जड असतो, परिणामी पचनशक्ती मंदावते आणि शरीरात कोल्ड एनर्जी वाढवते, त्यामुळे नुकसान होण्याची शक्यता असते.
advertisement
4/5
दही-काकडी एकत्र खाल्ल्याने पचनसंस्थेवरील ताण वाढवतो. दोन्ही पदार्थ शरीराची उष्णता कमी करतात. आयुर्वेदानुसार अग्नी अन्न पचवण्यासाठी आवश्यक असते. जेव्हा यासाठी आवश्यक उष्णता कमी होते, तेव्हा पचन मंदावते तेव्हा अन्नपदार्थांचं फर्मेंटेशन होतं.
advertisement
5/5
यामुळे पोट फुगणं, पोटात कळ, अपचन किंवा अ‍ॅसिडिटी, सूज, अॅलर्जी यासारखे त्रास वाढू शकतात. विशेषतः ज्या लोकांना पचनाची समस्या आहे, त्यांना याचे दुष्परिणाम अधिक जाणवू शकतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Cucumber Curd : दह्यात काकडी टाकून का खाऊ नये; कोशिंबीर किंवा रायता खाल्ल्याने काय होतं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल