TRENDING:

ब्रेकफास्टला पोहे, उपमा खाऊ नका! पुण्याच्या डॉक्टरांनी का दिला असा सल्ला? पर्यायी नाश्ताही सांगितला

Last Updated:
Indian Breakfast : कित्येक घरात सर्रास बनणारा नाश्ता, डॉक्टरांनी न खाण्याचा सल्ला दिला आहे. हे वाचून आश्चर्य वाटेल. यामागील कारणही डॉक्टरांनी सांगितलं आहे.
advertisement
1/5
ब्रेकफास्टला पोहे, उपमा खाऊ नका! पुण्याच्या डॉक्टरांनी का दिला असा सल्ला? पर्याय
ब्रेकफास्ट म्हटलं की कांदे पोहे, उपमा... बहुतेक घरात तुम्हाला हा नाश्ता पाहायला मिळेल. तसं हा नाश्ता हेल्दीही म्हटला जातो. पण पुण्यातील एका डॉक्टरने मात्र ब्रेकफास्टला पोहे, उपमा खाऊ नका, असा सल्ला दिला आहे. हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. डॉक्टरांनी यामागील कारणही सांगितलं आहे. (प्रतीकात्मक फोटो - AI Generated)
advertisement
2/5
डॉ. रितूपर्णा शिंदे असं या डॉक्टरांचं नाव. ते पुण्यातील कार्डिओलॉजिस्ट आहेत. त्यांनी सांगितलं की, आपण भारतीय आपल्या आपल्या दिवसाची सुरुवात कार्बोहायड्रेट्सने करतो आणि दिवसाचा शेवटही कार्बोहायड्रेट्सनेच होतो.
advertisement
3/5
सकाळी उठल्यावर पोहे, उपमा, डोसा, इडली, उत्तपा हे सगळं कार्बोहाड्रेट्सट. या गोष्टींचं प्रमाण कमी झालं पाहिजे, असं त्यांनी सांगितलं.<span style="font-size: 20px;"> </span>
advertisement
4/5
नाश्त्याला हमखास केले जाणारे हे सगळे पदार्थ. पण जर हेच खायचे नाही तर मग काय खायचं? याला पर्याय काय? तर डॉक्टरांनी बरेच हेल्दी पर्याय सांगितले आहेत.
advertisement
5/5
त्यांनी सांगितलं, सकाळी उठल्यावर सूप घ्या, दलिया जे खूप हेल्दी आहे, त्याची खिचडी बनवून खा. सांजा किंवा उपमा खायचा त्याऐवजी भगर खा. नॉनव्हेज खात असाल तर अंड्याचं ऑम्लेट करून खा, सलाड घ्या. आज आपण ज्याला वरण म्हणतो फॉरेनर लोक त्याला लेंटिल सूप म्हणतील, त्याचं सेवन करा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
ब्रेकफास्टला पोहे, उपमा खाऊ नका! पुण्याच्या डॉक्टरांनी का दिला असा सल्ला? पर्यायी नाश्ताही सांगितला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल