TRENDING:

तुम्ही वारंवार हॉटेलमध्ये राहता? सुरक्षा हवी असेल तर 'या' फ्लोरवरील रूम कधीच घेऊ नका, कारण...

Last Updated:
Travel Tips : जर तुम्ही वारंवार प्रवास (travel) करत असाल किंवा एकट्या महिला हॉटेलमध्ये थांबत असाल, तर तुमच्या सुरक्षिततेसाठी हॉटेलची रूम निवडताना...
advertisement
1/6
तुम्ही वारंवार हॉटेलमध्ये राहता? 'या' फ्लोरवरील रूम कधीच घेऊ नका, कारण...
Travel Tips : जर तुम्ही वारंवार प्रवास (travel) करत असाल किंवा एकट्या महिला हॉटेलमध्ये थांबत असाल, तर तुमच्या सुरक्षिततेसाठी हॉटेलची रूम निवडताना काही गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे. प्रवासाची आवड असो वा कामासाठी सतत हॉटेलमध्ये चेक-इन (check into hotels) करणे असो, सुविधांसोबतच सुरक्षेचा (safety) विचार करणे महत्त्वाचे आहे.
advertisement
2/6
तुम्ही ज्या हॉटेल रूममध्ये थांबत आहात, त्याचे ठिकाण (Room location) अत्यंत महत्त्वाचे आहे. तुमच्या जीवाला आणि मालमत्तेला कमी धोका कोणत्या मजल्यावर आहे, हे जाणून घेऊया.
advertisement
3/6
हॉटेलच्या तिसऱ्या ते सहाव्या (Third to Sixth) फ्लोरमधील मजले सर्वात सुरक्षित मानले जातात. सोप्या भाषेत सांगायचे तर, हॉटेल इमारतीचे मध्यम मजले सुरक्षित मानले जातात. याची कारणं पुढीलप्रमाणे...
advertisement
4/6
चोरीचा धोका कमी : हॉटेलचे खालचे मजले (Ground Floor) बाहेरून जाणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला सहज उपलब्ध होऊ शकतात. चोर किंवा संशायस्पद व्यक्तीसाठी लिफ्ट न वापरता किंवा सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीत न येता खालच्या मजल्यावरील खोलीत सहज प्रवेश करणे सोपे असते. अशा खोल्यांच्या खिडक्याही सहज पोहोचण्यायोग्य असतात.
advertisement
5/6
आगीचा धोका : जर हॉटेलमध्ये आग लागली, तर अग्निशमन दलाच्या गाड्यांना (fire trucks) वरच्या मजल्यांवर पोहोचणे कठीण होते. आग विझवण्यासाठी आणि बचाव कार्यासाठी मध्यम मजले सर्वात सोयीचे ठरतात. खूप वरचे मजले अधिक धोकादायक मानले जातात.
advertisement
6/6
सुरक्षितता : त्यामुळे, हॉटेल इमारतीच्या मध्यम मजल्यांवर (तिसरा ते सहावा मजला) राहणे शहाणपणाचे आहे, जे जमिनीपासून पुरेसे उंच आहेत आणि छताच्या (roof) जवळच्या मजल्यांपासूनही दूर आहेत. यामुळे तुम्ही चोरी आणि आणीबाणीच्या परिस्थितीपासून सुरक्षित राहू शकता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
तुम्ही वारंवार हॉटेलमध्ये राहता? सुरक्षा हवी असेल तर 'या' फ्लोरवरील रूम कधीच घेऊ नका, कारण...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल