Donkey Milk Soap: गाढविणीच्या दुधाच्या साबणाची जगभरात मागणी! 100gm साबणाची किंमत पाहून व्हाल शॉक, नेमके फायदे काय?
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
Donkey Milk Soap Benefits: गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियासह सर्वत्र गाढविणीच्या दुधाच्या साबणाची चर्चा सुरू आहे. जगभरात गाढविणीच्या दुधाच्या साबणाची मागणी वाढली आहे. नेमकी गेल्या काही दिवसांपासून जागतिक बाजारात गाढविणीच्या दुधाच्या साबणाची अचानक का मागणी वाढली? गाढविणीच्या दुधाची किंमत सुद्धा खूप जास्त आहे. 100 ग्रॅम साबणाची किंमत 320 ते 500 च्या दरम्यान आहे. सध्या गाढवाचं दूध का चर्चेत आलंय? जाणून घेऊया...
advertisement
1/7

सध्या अख्ख्या जगभरात गाढविणीच्या दुधापासून तयार करण्यात आलेल्या साबणाची चांगलीच चर्चा होत आहे. या साबणासाठी अख्ख्या जगभरातून जोरदार मागणी होत आहे. लोक हा साबण आवडीने खरेदी करतायत. अगदी कमी काळात हा साबण प्रसिद्ध झाला आहे.
advertisement
2/7
संयुक्त अरब अमिराती आणि इतर अनेक देशांमध्ये गाढवाच्या दुधापासून बनवलेला साबण मोठ्या प्रमाणात विकला जातो. दुबईसारख्या देशांत याचे प्रीमियम ब्रँड्स उपलब्ध असून तो मोठ्या प्रमाणात खरेदी केला जात आहे.
advertisement
3/7
गाढविणीचे दूध त्वचेसाठी फार उपयुक्त ठरते. त्यामध्ये भरपूर खनिजे आणि प्रथिने असून ही खनिजे त्वचेला पोषण देतात आणि त्वचा मऊ ठेवण्यास मदत करते. त्वचा निखळ ठेवण्यासाठी मदत करतो.
advertisement
4/7
यासोबतच दुधात मोठ्या प्रमाणावर अँटिऑक्सिडंट्स सुद्धा असतात जे त्वचेसाठी फायदेशीर ठरतात. अँटिऑक्सिडंट्स त्वचेचे संरक्षण करतात आणि हानिकारक घटकांपासून त्वचेचे रक्षण करते.
advertisement
5/7
वाढत्या वयामुळे चेहर्‍यावर येणार्‍या सुरकुत्यांच्या समस्या कमी करण्यासाठी हा साबण मदत करतो. नियमित वापराने त्वचेचा रंग एकसारखा दिसू लागतो आणि लहान सुरकुत्याही कमी होत जातात.
advertisement
6/7
गाढविणीचे दूध त्वचेवरील पेशी जीवंत करतं आणि त्वचेच्या समस्या दूर करतं. त्यामुळे त्वचा तजेलदार दिसते. गाढविणीच्या दुधाच्या साबणाने आंघोळ केल्याने त्वचेवरील डाग, मुरम आणि सुरकुत्या कमी होण्यास मदत होते, असं म्हटलं जातं.
advertisement
7/7
स्किन- केअरसाठी गाढविणीच्या दुधाचा साबण एक खास पर्याय मानला जातो. दुबईमध्ये तर गाढविणीच्या दुधापासून बनवलेले विविध ब्रँड्सचे साबण मोठ्या प्रमाणात विकले जातात. काही ब्रँड्स तर याला लक्झरी स्किनकेअर उत्पादन म्हणूनही प्रमोट करतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Donkey Milk Soap: गाढविणीच्या दुधाच्या साबणाची जगभरात मागणी! 100gm साबणाची किंमत पाहून व्हाल शॉक, नेमके फायदे काय?