TRENDING:

IND vs SA : टीम इंडियात सिलेक्शन तर झालं, पण... अख्ख्या वनडे सीरिजमध्ये बेंचवरच बसणार 4 खेळाडू!

Last Updated:
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन वनडे सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. टीममध्ये अनेक खेळाडूंचं बऱ्याच काळानंतर कमबॅक झालं आहे, पण यातल्या काही खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.
advertisement
1/6
टीम इंडियात सिलेक्शन तर झालं, पण... वनडे सीरिजमध्ये बेंचवरच बसणार 4 खेळाडू!
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 3 वनडे मॅचच्या सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे. दुखापतग्रस्त शुभमन गिलऐवजी केएल राहुलला वनडे टीमची कॅप्टन्सी सोपवण्यात आली आहे.
advertisement
2/6
वनडे टीममध्ये रवींद्र जडेजा आणि ऋतुराज गायकवाडचंही कमबॅक झालं आहे. ऋतुराज गायकवाड तब्बल 2 वर्षांनी भारतीय टीममध्ये पुनरागमन करत आहे. तर ऑस्ट्रेलिया दौऱ्यात विश्रांती देण्यात आलेला रवींद्र जडेजाही पुन्हा वनडे टीममध्ये दिसणार आहे.
advertisement
3/6
ध्रुव जुरेलला बॅक अप विकेट कीपर म्हणून निवडण्यात आलं आहे. तर ऋषभ पंतही टीममध्ये आहे. मागच्या काही काळापासून केएल राहुल वनडे टीममध्ये विकेट कीपिंग करत आहे, त्यामुळे ध्रुव जुरेलला सीरिजमध्ये खेळण्याची संधी मिळणं कठीण आहे.
advertisement
4/6
नितीश कुमार रेड्डीचंही वनडे टीममध्ये सिलेक्शन झालेलं असलं तरी प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याला स्थान मिळणं मुश्किल आहे. हर्षित राणाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात बॉलिंगसोबतच खालच्या क्रमांकावर चांगली बॅटिंगही केली होती. याशिवाय टीममध्ये अर्शदीप सिंग आणि प्रसिद्ध कृष्णाही आहे, त्यामुळे केएल राहुल तीन फास्ट बॉलर आणि दोन स्पिनरसोबत मैदानात उतरू शकतो.
advertisement
5/6
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात चांगली कामगिरी केलेल्या वॉशिंग्टन सुंदरलाही आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये बेंचवरच बसावं लागू शकतं. कारण टीममध्ये अनुभवी ऑलराऊंडर रवींद्र जडेजाचं कमबॅक झालं आहे. कुलदीपसोबत दुसरा स्पिनर म्हणून रवींद्र जडेजावर विश्वास दाखवला जाईल.
advertisement
6/6
ऋतुराज गायकवाडचं दोन वर्षांनी टीम इंडियात कमबॅक झालं असलं, तरी त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. कारण रोहित शर्मासोबत यशस्वी जयस्वाल ओपन करेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs SA : टीम इंडियात सिलेक्शन तर झालं, पण... अख्ख्या वनडे सीरिजमध्ये बेंचवरच बसणार 4 खेळाडू!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल