Basin Pipe Cleaning Tips: असा स्वच्छ ठेवा Sink चा पाईप, 2 मिनिटाच्या मेहनतीने रोजच्या कटकटीवर कायमचं Solution
- Published by:Devika Shinde
Last Updated:
कितीही घर साफ करण्याचा विचार केला तरी हे पाईप काही साफ होत नाही. त्याला सतत काढून घासण्याचा देखील जोखीम घेऊ शकत नाही.
advertisement
1/6

आपलं घर स्वच्छ रहावं असं प्रत्येकाला वाटतं आणि त्यासाठी लोक प्रयत्न देखील करतात. यामध्ये कचरा काढणं, फरशी साफ करणं, वस्तू जागच्याजागी ठेवणं या सगळ्या गोष्टी येतात. पण या सगळ्यात थोडं कठीण आणि कंटाळवाणं काम आहे बाथरूमचे वॉश बेसिन किंवा किचन सिंकचा पाईप साफ करणे.
advertisement
2/6
कितीही घर साफ करण्याचा विचार केला तरी हे पाईप काही साफ होत नाही. त्याला सतत काढून घासण्याचा देखील जोखीम घेऊ शकत नाही.
advertisement
3/6
वॉश बेसिन किंवा सिंकमधून पाणी काढून टाकण्यासाठी त्याच्या खाली एक प्लास्टिक पाईप जोडलेला आहे. परंतू हा प्लास्टिकचा पाईप फार पातळ असल्यामुळे त्याला घासलं तर त्याचं आयुष्य कमी होतं. ज्यामुळे ते लवकर तुटतात. ते रोज काढून स्वच्छ केल्याने तुटण्याचा धोका राहतो. परंतू हा त्रास टाळण्यासाठी आपण ॲल्युमिनियम फॉइल वापरू शकता.
advertisement
4/6
पाईप जास्त काळ स्वच्छ ठेवण्यासाठी आणि जास्त काळ टिकण्यासाठी ॲल्युमिनियम फॉइल वापरा. यासाठी प्रथम फॉइल पेपर रोल करा. आता पाईपच्या आकाराप्रमाणे फॉइल कापून घ्या. पुढे, पाईपभोवती फॉइलचे दोन ते तीन गोल गुंडाळा. फॉइल कव्हरमुळे तुमचा पाईप पूर्णपणे सुरक्षित राहिल.
advertisement
5/6
फॉइल पेपर व्यतिरिक्त, तुम्ही बाथरूम वॉश बेसिन किंवा सिंक पाईप्स गलिच्छ होण्यापासून वाचवण्यासाठी सायकल टायर देखील वापरू शकता. तुम्हाला हा उपाय जरा अवघड वाटेल, पण तो खूप प्रभावी आहे हे पाइपला दीर्घकाळ स्वच्छ आणि मजबूत ठेवण्याचे काम करते.
advertisement
6/6
जर तुम्हाला वॉश बेसिन किंवा सिंक पाईप स्वच्छ आणि सुरक्षित ठेवण्यासाठी टायर वापरायचे असतील तर प्रथम पाईप काढा आणि मोजा. आता सायकलचा टायर पाईपच्या आकारात कापून घ्या. पुढे, पाईपवर टायर ठेवा आणि वॉश बेसिन किंवा सिंकच्या खाली सेट करा. मग हा पाईप नेहमी स्वच्छ असेल आणि बराच काळ वापरला जाऊ शकतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Basin Pipe Cleaning Tips: असा स्वच्छ ठेवा Sink चा पाईप, 2 मिनिटाच्या मेहनतीने रोजच्या कटकटीवर कायमचं Solution