Ghee Benefits : हिवाळ्यात तूप खा आणि आजारांना ठेवा दूर, या 5 प्रकारे करा उपाय!
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
हिवाळ्यात थंडीमुळे लोक सतत आजारी पडताना दिसतात. सर्दी खोकला अशा आजारांनी अधिक बाधित होतात. मात्र हिवाळ्यात स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही तूप खाऊ शकता. यामुळे आजारांपासून तुम्हाला आराम मिळेल.
advertisement
1/8

2/8
आयुर्वेदानुसार, मसाले आणि औषधी वनस्पती यांसारख्या गोष्टींमध्ये तूप मिसळल्यानं ताप, घसादुखी, सर्दी, खोकला दूर होण्यास मदत होते.
advertisement
3/8
आयुर्वेदानुसार, मसाले आणि औषधी वनस्पती यांसारख्या गोष्टींमध्ये तूप मिसळल्यानं ताप, घसादुखी, सर्दी, खोकला दूर होण्यास मदत होते.
advertisement
4/8
एक चमचा तूप वितळवून त्यात ताजे किसलेले आलं घालून खा. हिवाळ्यात आलं खाणं फायदेशीर ठरेल आणि त्याच्या संभाव्य डीकंजेस्टेंट आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या गुणधर्मांचा फायदा होईल.
advertisement
5/8
काही लवंग तुपात गरम करून त्यात मध मिसळून पेस्ट बनवून खा. यामुळे ताप, सर्दी आणि रक्तसंचय बरा करण्यास मदत होते.
advertisement
6/8
एक चमचा तुपात एक चमचा मध मिसळा. अशा प्रकारे तूप खाल्ल्यानं खोकला आणि घसादुखीपासून आराम मिळू शकतो.
advertisement
7/8
एक कप गरम पाण्यात किंवा हर्बल चहामध्ये एक चमचा तूप आणि चिमूटभर काळी मिरी मिसळा. हे प्यायल्यानं घसादुखी आणि जडपणापासून आराम मिळेल. आणि रोगांशी लढण्यास मदत होईल.
advertisement
8/8
तूप, हळद, काळी मिरी आणि दूध यांचं मिश्रण करून प्यायल्यानं हिवाळ्यात सर्दी, ताप या समस्यांपासूनही आराम मिळतो. हळद अँटी-व्हायरल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांनी समृद्ध आहे, ज्यामुळे रक्तसंचय कमी होण्यास मदत होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Ghee Benefits : हिवाळ्यात तूप खा आणि आजारांना ठेवा दूर, या 5 प्रकारे करा उपाय!