Sweet : गोड खाल्ल्यावर सुस्ती का येते? डॉक्टरांकडून यामागचं खरं सायन्स जाणून घेतलात तर तुम्हाला धक्का बसेल
- Published by:Devika Shinde
Last Updated:
विज्ञानाच्या भाषेत याला 'शुगर क्रॅश' म्हणतात, जे तुमच्या झोपेचे खोबरं करू शकतं. नेमकं काय घडतं शरीरात? चला सविस्तर जाणून घेऊया.
advertisement
1/8

दिवसभराच्या कामानंतर रात्रीचे जेवण झाले की, काहीतरी 'गोड' खाण्याची इच्छा अनेकांना होते. मग तो गुलाबाचा जाम असो, चॉकलेटचा तुकडा किंवा आईस्क्रीम. अनेकदा आपल्याला असं वाटतं की, गोड खाल्ल्यानंतर छान सुस्ती येते आणि झोप चांगली लागेल. पण तुम्ही कधी अनुभवले आहे का की, गोड खाऊन झोपल्यानंतर मध्यरात्री अचानक जाग येते किंवा सकाळी उठल्यावर फ्रेश वाटत नाही?
advertisement
2/8
जर तुम्हालाही वाटत असेल की मिठाई आणि झोपेचा जवळचा संबंध नाही तर तुम्ही चुकीचा विचार करताय, कारण विज्ञानाच्या भाषेत याला 'शुगर क्रॅश' म्हणतात, जे तुमच्या झोपेचे खोबरं करू शकतं. नेमकं काय घडतं शरीरात? चला सविस्तर जाणून घेऊया.
advertisement
3/8
गोड खाल्ल्यावर खरंच झोप येते का?डॉक्टरांच्या मते, गोड खाल्ल्यानंतर रक्तातील साखरेची पातळी (Blood Sugar Level) अचानक वाढते. यामुळे काही काळ आपल्याला हायसं वाटतं किंवा सुस्ती येते. पण ही सुस्ती म्हणजे खरी झोप नव्हे. साखरेची पातळी वाढताच शरीर 'इन्सुलिन' सोडते, ज्यामुळे साखर वेगाने कमी होते. यालाच ‘शुगर क्रॅश’ म्हणतात. रक्तातील साखर अचानक कमी झाल्यामुळे शरीरात कोर्टिसोल आणि एड्रेनालिन सारखी स्ट्रेस हार्मोन्स वाढतात, ज्यामुळे तुमची झोपमोड होऊ शकते.
advertisement
4/8
चांगली झोप हवी असेल तर मिठाई का टाळावी?रात्री झोपण्यापूर्वी साखरेचे पदार्थ खाणे तुमच्या आरोग्यासाठी 'या' 5 कारणांमुळे घातक ठरू शकते:साखरेची पातळी वाढणे आणि नंतर वेगाने पडणे यामुळे रात्री वारंवार जाग येते आणि झोपेची गुणवत्ता खराब होते. संशोधनानुसार, रक्तातील वाढलेली साखर 'मेलाटोनिन' (झोपेचे हार्मोन) तयार होण्याच्या प्रक्रियेत अडथळा आणते. साखर खाल्यामुळे मेंदूतील डोपामाइन आणि ओरॅक्सिनसारखे घटक सक्रिय होतात, जे तुम्हाला झोपण्याऐवजी सतर्क ठेवतात. रात्री जड किंवा गोड पदार्थ खाल्ल्याने पित्त (Acidity), अपचन आणि अस्वस्थता जाणवू शकते.दररोज रात्री गोड खाऊन झोपण्याच्या सवयीमुळे वजन वाढणे, इन्सुलिन रेझिस्टन्स आणि 'स्लीप एपनिया' सारख्या आजारांचा धोका वाढतो.
advertisement
5/8
दूध आणि केळी खाल्ल्यावर झोप का येते?अनेकांना प्रश्न पडतो की, मग दूध किंवा केळी खाल्ल्यावर झोप कशी येते? त्याचे कारण म्हणजे 'ट्रिप्टोफॅन' (Tryptophan). हे एक अमिनो अ‍ॅसिड आहे जे झोपेसाठी उपयुक्त सेरोटोनिन तयार करण्यास मदत करते. पण लक्षात ठेवा, ट्रिप्टोफॅन तेव्हाच प्रभावी ठरते जेव्हा त्यासोबत 'कॉम्प्लेक्स कार्ब्स' (उदा. होल-ग्रेन टोस्ट) घेतले जातात. केवळ साखरेची चॉकलेट बार खाल्यास झोप येत नाही, उलट साखर वाढते.
advertisement
6/8
झोपण्यापूर्वी भूक लागली तर काय खावे? (तज्ज्ञांचे पर्याय)जर तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी काहीतरी खाण्याची इच्छा झालीच, तर डॉक्टरांनी सुचवलेले हे पर्याय निवडा:थोडे बदाम आणि अक्रोड, किंवा होल-ग्रेन क्रॅकर्ससोबत थोडे चीज.कॅमोमाइल टी (Chamomile Tea) प्यायल्याने मन शांत होते आणि चांगली झोप लागते.टार्ट चेरी ज्यूस यात नैसर्गिक मेलाटोनिन असते, जे झोपेची गुणवत्ता सुधारते.कीवी किंवा केळी यात पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असते, जे स्नायूंना आराम देऊन झोप येण्यास मदत करतात.
advertisement
7/8
थोडक्यात सांगायचे तर साखरेचा गोडवा जिभेला सुखावत असला, तरी तो तुमच्या झोपेचा शत्रू ठरू शकतो. त्यामुळे शांत आणि गाढ झोप हवी असेल, तर रात्रीच्या वेळी मिठाईला 'नाही' म्हणायला शिका.
advertisement
8/8
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे, न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही, आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Sweet : गोड खाल्ल्यावर सुस्ती का येते? डॉक्टरांकडून यामागचं खरं सायन्स जाणून घेतलात तर तुम्हाला धक्का बसेल