Health Tips : प्रदूषणामुळे नाक आणि घश्यातील इंफेक्शनने त्रस्त आहात? 4 घरगुती उपाय देतील आराम
- Published by:Pooja Pawar
Last Updated:
मुंबई, दिल्ली सारख्या परिसरात सध्या हवेच प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. प्रदूषित हवेमुळे घसा खवखवणे, सर्दी होणे यासह आरोग्याच्या विविध समस्या जाणवू लागतात. अशावेळी प्रदूषित वातावरणात स्वतःची काळजी कशी घ्यावी? हे जाणून घ्या.
advertisement
1/4

हळद घातलेल दूध : हळदीचे दूध अनेक समस्यांपासून आराम मिळवून देण्यासाठी प्रभावी आहे, त्यामुळे ऋतू कोणताही असो, दररोज रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे दूध प्यायल्याने नाक आणि घशाच्या संसर्गापासून दूर राहता येते. तसेच दुधाचे गुणधर्म आणखी वाढवण्यासाठी, दुधात हळदीसह दोन चिमूट कोरडे आले देखील घालू शकता यामुळे घश्याशी संबंधित आजार होणार नाहीत.
advertisement
2/4
तुळशीचा काढा : सकाळची सुरुवात चहा ऐवजी कढ्याने केल्यास आरोग्याला त्याचा फायदा होऊ शकतो.तुळशीच्या पानांमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. तुळशीचा काढा तयार करता असताना त्यात काळी मिरी, आले, हळद आणि मीठ घाला. हे पेय तुम्हाला प्रदूषणामुळे होणाऱ्या संसर्गापासून सुरक्षित ठेऊ शकते.
advertisement
3/4
मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करा : हवामान आणि प्रदूषणामुळे होणा-या संसर्गापासून आराम मिळवण्यासाठी मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करणे फायदेशीर ठरू शकते. मिठाच्या पाण्याने घसा साफ होतो. त्यामुळे सूज येण्याच्या समस्येपासूनही आराम मिळतो. कोमट पाण्यात मीठ घालून दिवसातून दोन ते तीन वेळा गुळण्या करा आणि या समस्यांपासून दूर राहा.
advertisement
4/4
गरम वाफ घ्या : नाक, घसा आणि फुफ्फुसे स्वच्छ करण्यासाठी गरम वाफ घेणे देखील एक प्रभावी मार्ग आहे. पाणी गरम करून वाफवून घ्या. हवे असल्यास त्यात विक्स टाका. असे केल्याने श्वसनमार्ग साफ होतो. खोकला इत्यादी समस्याही दूर होतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Health Tips : प्रदूषणामुळे नाक आणि घश्यातील इंफेक्शनने त्रस्त आहात? 4 घरगुती उपाय देतील आराम