Fennel Seeds : 'या' आरोग्य समस्या असलेल्या लोकांनी अजिबात खाऊ नका बडीशेप, वाढेल त्रास..
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Fennel Seeds Side Effects : जेवणानंतर बडीशेप खाण्याची सवय बऱ्याच लोकांना असते. यामुळे जेवण पचतं. बरेच लोक उन्हाळ्यात सरबतांमध्येही बडीशेप टाकतात. बडीशेपचा प्रभाव थंड असून तिच्यामुळे शरीराला थंडावा मिळतो. असे लोकांना वाटते. बडीशेप खाण्याचे अनेक फायदे आहे. मात्र काही लोकांसाठी बडीशेप हानिकारक ठरू शकते. चला पाहूया, कोणते त्रास असलेल्या लोकांनी बडीशेप खाऊ नये.
advertisement
1/9

आपल्या पारंपारिक स्वयंपाक पद्धतीमध्ये अन्न हे एक प्रकारचे औषध आहे. काही घटक सहसा चवीनुसार अन्नपदार्थांमध्ये टाकले जातात. बरेच पदार्थ आपले आरोग्य सुधारण्यास आणि शरीरातील विविध रोगांवर उपचार करण्यास सक्षम आहेत.
advertisement
2/9
असाच एक शक्तिशाली घटक म्हणजे बडीशेप, जी नेहमी आपल्या घरच्या स्वयंपाकघरात असते. बडीशेप खाण्याचे आरोग्य फायदे असले तरी त्याचे जास्त सेवन केल्याने अनेक नकारात्मक परिणाम होऊ शकतात.
advertisement
3/9
गर्भवती महिलांनी जास्त प्रमाणात बडीशेप खाणे टाळावे. कारण यामुळे गर्भाशयाचे आकुंचन होऊ शकते आणि वेळेपूर्वी प्रसूती होऊ शकते.
advertisement
4/9
श्वासोच्छवासाच्या समस्या असलेले लोक बडीशेप खाऊ शकतात. ती शरीरासाठी फायदेशीर आहे. पण काही लोकांना याची ॲलर्जी असते. त्यामुळे त्यांचा नेहमी जपून वापर करा.
advertisement
5/9
काही लोकांना जास्त प्रमाणात बडीशेप खाल्ल्यास त्वचारोग, त्वचेचा संसर्ग होऊ शकतो. त्याचबरोबर त्वचेवर जळजळ आणि फोडदेखील येऊ शकतात.
advertisement
6/9
एपिलेप्सी आणि मज्जातंतूंच्या समस्यांसाठी तुम्ही आधीच काही औषधे घेत असाल तर बडीशेप खाऊ नका, असे सांगितले जाते. कारण यामुळे स्थिती बिघडू शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
advertisement
7/9
किडनी खराब झालेले लोक आणि ज्यांनी किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया केली आहे, त्यांनी थोड्या प्रमाणात बडीशेप खाल्ली तर समस्या होणार नाही. पण जास्त प्रमाणात खाल्ल्यास किडनी खराब होऊ शकते.
advertisement
8/9
बडीशेप दातांवर जंतूंमुळे होणारे नुकसान टाळते, त्यामुळे याचे सेवन कमी प्रमाणात केल्यास कोणत्याही समस्या टाळता येतात.
advertisement
9/9
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Fennel Seeds : 'या' आरोग्य समस्या असलेल्या लोकांनी अजिबात खाऊ नका बडीशेप, वाढेल त्रास..