TRENDING:

वयाच्या 16 व्या वर्षी राजेश खन्नाच्या प्रेमात, 12 वर्षे सोबत राहिली; म्हणे, 'मी सरोगेट पत्नी', कोण आहे अनिता अडवाणी?

Last Updated:
मुंबई उच्च न्यायालयाने अनिता अडवाणी यांची राजेश खन्नांसोबतच्या कथित नात्याला विवाह मान्यता देण्याची याचिका फेटाळली, त्यांचे जुने दावे पुन्हा चर्चेत.
advertisement
1/9
वयाच्या 16 व्या वर्षी प्रेमात, 12 वर्ष सोबत राहिली, म्हणे 'मी राजेश खन्नाची मी सरोगेट पत्नी'; कोण आहे अनिता अडवाणी?
राजेश खन्ना यांच्यासोबतच्या आपल्या कथित संबंधांना विवाह म्हणून मान्यता मिळावी म्हणून अनिता अडवाणी यांनी कोर्टात एक याचिका केली होती. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली आहे. 
advertisement
2/9
राजेश खन्ना यांच्या मृत्यूच्या 13 वर्षांनी त्यांचं वैयक्तिक आयुष्य पुन्हा चर्चेत आलं आहे. 16 व्या वर्षी राजेश खन्नाच्या प्रेमात पडली, मी त्यांची सरोगेट बायको असल्याचं सांगणारी  अनिता अडवाणी कोण आहेत. 
advertisement
3/9
अनिता अडवाणी यांनी त्यांच्या पुस्तकातही राजेश खन्नांबरोबरच्या नात्याबद्दल लिहिलं आहे. 'रील मीट्स रिअल'ला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत अनिता अडवाणी राजेश खन्नाबद्दल बोलताना म्हणाल्या होत्या, "जेव्हा मी त्यांना पहिल्यांदा भेटले तेव्हा मी किशोरवयीन होते आणि आमचे प्रेम खूप लवकर फुलले. त्यांनी माझ्या हृदयावर आणि मनावर इतका खोल ठसा उमटवला की मी दुसऱ्या कोणाचाही विचार करू शकले नाही."
advertisement
4/9
"आम्ही एकमेकांना भेटत राहिलो आणि अखेरीस जेव्हा त्यांच्या आयुष्यातील प्रत्येकाने त्यांना सोडून दिलं होतं जेव्हा त्यांच्या कुटुंबातील कोणीही त्यांच्यासोबत नव्हतं तेव्हा आम्ही पुन्हा भेटलो. त्यानंतर आम्ही सुमारे 12 वर्षे एकत्र राहिलो."
advertisement
5/9
अनिता पुढे म्हणाल्या, "मला यापेक्षा चांगला माणूस मिळूच शकला नसता. तो लाखो लोकांमधून एक होता. गोष्ट अशी आहे की, मी खूप लहान वयात त्याच्यासोबत नात्यात होते. मी एका पारंपरिक कुटुंबातून आले होते, त्यामुळे मला वाटायचे की तोच माझे सर्वस्व आहे."
advertisement
6/9
"जसजशी मी मोठी होत गेले तसतसे लोक माझ्या मागे लागले. पण मला दुसरा कोणीच दिसला नाही. मी त्यात अडकले होते. मला दुसऱ्या कोणत्याही पुरुषाने स्पर्श केलेला आवडत नव्हता. तो माझ्यासाठी एक मानसिक अडथळा बनला होता."
advertisement
7/9
राजेश खन्ना यांच्या मृत्यूनंतर तिला ज्या प्रकारे वागणूक मिळाली त्यामुळे त्या खूप व्यथित झाल्या होत्या. त्यांना राजेश खन्नांना शेवटचं भेटूही दिलं नव्हतं. एका मुलाखतीत त्या म्हणाल्या होत्या, "मी स्वतःला राजेश खन्ना यांची सरोगेट पत्नी मानते. मी त्यांच्या आशीर्वादाने आठ वर्षे त्यांच्यासोबत राहिले. पत्नीप्रमाणे त्यांची काळजी घेतली."
advertisement
8/9
तिने राजेशच्या कुटुंबालाही त्यांना प्रश्न विचारला होता. त्या म्हणाल्या "जेव्हा ते एकटेपणा आणि नैराश्याशी झुंजत होते तेव्हा ते कुठे होते? मीच त्यांची काळजी घेतली, मीच त्यांच्यासाठी करवा चौथ साजरा केला. मला आणखी काय पुरावा देण्याची गरज आहे?"
advertisement
9/9
स्वत:ला राजेश खन्ना यांची सरोगेट बायको मानणाऱ्या अनिता अडवाणी या देखील अभिनेत्री आहेत. 80 च्या काळात त्यांनी अनेक सिनेमात काम केलं आहे. साझिश ( 1988 ) दासी (1981) आओ प्यार करे ( 1983 ) हे त्यांचे काही गाजलेले सिनेमे आहेत. बिग बॉस 7 मध्ये त्या सहभागी झाल्या होत्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
वयाच्या 16 व्या वर्षी राजेश खन्नाच्या प्रेमात, 12 वर्षे सोबत राहिली; म्हणे, 'मी सरोगेट पत्नी', कोण आहे अनिता अडवाणी?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल