TRENDING:

प्रेमात पडलात, लग्नही केलं, पण आता होतोय पश्चाताप, लव्ह मॅरेज तरी नात्यात दुरावा का? 5 मोठी कारणं

Last Updated:
Couple distance after love marriage : जेव्हा काही वर्षांनी लव्ह मॅरेज कटुतेत बदलतो तेव्हा मनात अनेक प्रश्न निर्माण होऊ लागतात. असं काय झालं की जे एकमेकांच्या नजरेत हरवले होते ते आता एकमेकांच्या नजरेतून वाचू लागले?
advertisement
1/7
आधी प्रेम, मग लग्न, पण आता होतोय पश्चाताप, लव्ह मॅरेज तरी  नात्यात दुरावा का?
एखाद्याच्या प्रेमात पडणं, त्याच्यावर वेड्यासारखं प्रेम करणं, लग्नाची वेळ आली आणि कुणी विरोधात गेलं की सगळ्यांशी लढून लग्न करणं. लव्ह मॅरेज यात कठीण परीक्षा द्यावी लागते, अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं. पण  इतकं सगळं करूनही लग्नानंतर मात्र लव्ह मॅरेजचा पश्चाताप अनेक कपल्सना होतो.
advertisement
2/7
लग्नाआधी एकमेकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या कपलमध्ये लग्नानंतर मात्र दुरावा येऊ लागतो. असं का? याची एक-दोन नाही तर तब्बल 5 कारणं आहेत.
advertisement
3/7
लग्नापूर्वी जोडीदाराबाबत सगळं काही चांगलं वाटतं. पण लग्नानंतर त्याच्या आवडणाऱ्या त्याच सवयी त्रासदायक ठरतात. बऱ्याचदा वाटतं की लग्नानंतर जोडीदार बदलेल, पण तसं होत नाही तेव्हा भांडणं वाढू लागतात.
advertisement
4/7
लव्ह मॅरज करणाऱ्या अनेक कपल्सना कुटुंबाशी जुळवून घेण्यास त्रास होतो. विशेषतः जेव्हा दोन्ही जोडीदार वेगवेगळ्या सामाजिक किंवा सांस्कृतिक पार्श्वभूमीतून येतात तेव्हा नात्यात तणाव वाढू शकतो.
advertisement
5/7
प्रेमात सर्वकाही सामायिक असतं, पण लग्नात निर्णय, पैसा आणि जबाबदाऱ्यांवरून अनेकदा संघर्ष होतात. एकमेकांचं न ऐकणं, आपलंच बरोबर हे सिद्ध करण्याचा हट्ट यामुळे नातं कमकुवत होतं.
advertisement
6/7
लग्नानंतर जबाबदाऱ्या वाढल्या की प्रेमसंबंध आणि एकमेकांना वेळ देणं कमी होतं, यामुळे नात्यात पोकळी निर्माण होते. संभाषण आणि भावनिक जोड तुटते, ज्यामुळे नात्यात अंतर येणं निश्चितच आहे.
advertisement
7/7
सोशल मीडिया किंवा आजूबाजूला इतर कपल्सचं आयुष्य पाहतो आणि आपल्या नात्यात कमतरता जाणवतात. आपल्या जोडीदाराशी तुलना केल्याने आणि सतत दुःखी राहिल्याने मतभेद निर्माण होतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
प्रेमात पडलात, लग्नही केलं, पण आता होतोय पश्चाताप, लव्ह मॅरेज तरी नात्यात दुरावा का? 5 मोठी कारणं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल