TRENDING:

गोड जिलेबी आवडत नाही? मग तिखट खा, चहामध्ये बुडवून लागते एकदम भारी!

Last Updated:
जिलेबी म्हटलं की, अनेकजणांच्या तोंडाला आपसूक पाणी सुटतं, तर काहीजणांचं डोकं दुखू लागतं. दोघांचंही कारण असतं तिचा प्रचंड गोडवा. तुम्हालासुद्धा जिलेबी अति गोड वाटत असेल आणि म्हणून तुम्ही ती खाऊ शकत नसाल, तर ही माहिती तुमच्याचसाठी आहे. आता चकलीसारखी काहीशी तिखट जिलेबीही मिळू लागलीये, जी तुम्ही चक्क चहामध्ये बुडवून खाऊ शकता. (अमित कुमार, प्रतिनिधी / समस्तीपूर)
advertisement
1/5
गोड जिलेबी आवडत नाही? मग तिखट खा, चहामध्ये बुडवून लागते एकदम भारी!
ही नमकीन जिलेबी आपल्याला सहज कुठेही मिळू शकते. परंतु बिहारच्या समस्तीपूरमध्ये ती विशेष प्रसिद्ध आहे. तिथे तिला 'झिल्ली' या नावाने ओळखलं जातं.
advertisement
2/5
असं म्हणतात की, मिठाईचा पुडा उघडल्यावर त्यातल्या एका तुकड्यावर आपलं समाधान होऊ शकत नाही, तर आपल्याला ती पुन्हा पुन्हा खावीशी वाटते. त्याचप्रमाणे ही जिलेबी काहीशी तिखट असली, तरी तीसुद्धा खवय्यांना पुन्हा पुन्हा खावीशी वाटते एवढी तिची चव भारी असते.
advertisement
3/5
समस्तीपूरचे दुकानदार शिवम कुमार सांगतात की, बेसन, सोडा, मसाला, जिरा पावडर, हळद आणि काळं मीठ पाण्यात मिसळून ही जिलेबी बनवली जाते. चाळणीत हे मिश्रण घालून तेलात तळल्यानंतर कुरकुरीत जिलेबी तयार होते. चहामध्ये बुडवून ती एकदम टेस्टी लागते.
advertisement
4/5
किंमतीबाबत बोलायचं झाल्यास दुकानात ही एक जिलेबी साधारण 3 रुपयांना मिळते. म्हणजेच खिशाला परवडणारी तिची किंमत आहे.
advertisement
5/5
विशेष म्हणजे ज्यांना जिलेबी खावीशी वाटेत पण तिच्या गोडव्यामुळे डोकं दुखतं किंवा पोट बिघडतं, ते या जिलेबीचा आवडीने आस्वाद घेऊ शकतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
गोड जिलेबी आवडत नाही? मग तिखट खा, चहामध्ये बुडवून लागते एकदम भारी!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल