Boiling Egg Hack : अंडं सोलताना तुकडे निघतात? गृहिणीनींनो स्वयंपाकघरातील फक्त 'ही' एक गोष्ट वापरा, नेहमीची कटकट संपवा
- Published by:Devika Shinde
Last Updated:
जर तुम्हालाही या समस्येचा सामना करावा लागत असेल, तर आता काळजी करू नका. तुमच्या स्वयंपाकघरातील काही साध्या गोष्टी वापरून तुम्ही अगदी प्रोफेशनल शेफप्रमाणे अंड्याची साल काही सेकंदात काढू शकता.
advertisement
1/7

"संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे!" हे वाक्य आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. प्रथिनांचा (Protein) उत्तम स्रोत म्हणून डॉक्टरही रोज एक उकडलेले अंडे खाण्याचा सल्ला देतात. पण, हेच अंडे उकडल्यानंतर ते सोलणे म्हणजे कधीकधी मोठं टास्क होतं. अनेकदा अंडे सोलताना त्याचे साल हे पांढऱ्या भागाला चिकटून बसतात आणि त्याच्या कडक कवचीसोबत अंड्याचा अर्धा भागही बाहेर येतो. यामुळे अंड्याचा आकार तर बिघडतोच, पण खातानाही मजा येत नाही.
advertisement
2/7
जर तुम्हालाही या समस्येचा सामना करावा लागत असेल, तर आता काळजी करू नका. तुमच्या स्वयंपाकघरातील काही साध्या गोष्टी वापरून तुम्ही अगदी प्रोफेशनल शेफप्रमाणे अंड्याची साल काही सेकंदात काढू शकता.
advertisement
3/7
1. व्हिनेगरची जादू (Vinegar Hack)अंडी उकडताना पाण्यात मीठ टाकणं हे आपल्याला माहिती आहे, पण त्यापेक्षाही प्रभावी उपाय म्हणजे व्हिनेगर. अंडी उकडत असलेल्या पाण्यात फक्त एक चमचा व्हिनेगर टाका. व्हिनेगरमधील आम्लीय (Acidic) गुणधर्मामुळे अंड्याचे कवच थोडे मऊ होते. यामुळे उकडल्यानंतर कवच अंड्याला न चिकटता अगदी सहज वेगळा होतो.
advertisement
4/7
2. बेकिंग सोडा ठरेल फायदेशीरजर तुमच्याकडे व्हिनेगर नसेल, तर काळजी करू नका. उकळत्या पाण्यात चिमूटभर बेकिंग सोडा टाका. बेकिंग सोडामुळे पाण्याची क्षारता वाढते, ज्यामुळे अंड्याचे कवच आणि आतील पांढरा भाग यांच्यातील थर ढिला होतो. परिणामी, कवच सोलणं खूप सोपे जातं.
advertisement
5/7
3. 'शॉक ट्रीटमेंट' द्या (Ice Water Trick)अंडी उकडण्याची एक योग्य पद्धत असते. पाणी चांगले उकळल्यावरच त्यात अंडी सोडा. अंडी शिजली की लगेच गरम पाणी ओतून टाका आणि ती अंडी बर्फाच्या थंड पाण्यात टाका. याला 'शॉक ट्रीटमेंट' म्हणतात. यामुळे अंड्याचा आतील भाग आकुंचन पावतो आणि कवचापासून लगेच वेगळा होतो.
advertisement
6/7
4. योग्य वेळी सोलाअंडी थंड पाण्यात किमान पाच मिनिटे राहू द्या. त्यानंतर अंडी काढून जमिनीवर किंवा वाटीच्या कडेला हलकी टॅप करा. तुम्ही पाहाल की अंड्याचे कवच थरावर थर अशा रीतीने अगदी लोण्यासारखे निघून येतील.
advertisement
7/7
फायदा काय? या टिप्स वापरल्यामुळे तुमची अंडी दिसायला तर सुंदर दिसतीलच, शिवाय पाहुण्यांसमोर सर्व्ह करताना ती आकर्षक वाटतील. तुमचा वेळ वाचेल आणि अंड खराबही होणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
Boiling Egg Hack : अंडं सोलताना तुकडे निघतात? गृहिणीनींनो स्वयंपाकघरातील फक्त 'ही' एक गोष्ट वापरा, नेहमीची कटकट संपवा