TRENDING:

मुलं घरात नीट जेवत नाही? मग बनवा हा खास लाडू, सोपी रेसिपी

Last Updated:
हिवाळा सुरू झाला की अनेक चटपटीत, गोड आणि इतर वेगवेगळे पदार्थ खाण्याची इच्छा होते. हिवाळ्यात तुम्ही ड्रायफ्रुटचे लाडू बनवू शकता.
advertisement
1/7
मुलं घरात नीट जेवत नाही? मग बनवा हा खास लाडू, सोपी रेसिपी
हिवाळा सुरू झाला की अनेक चटपटीत, गोड आणि इतर वेगवेगळे पदार्थ खाण्याची इच्छा होते. पण नेहमी बाहेरील पदार्थ खाणे शक्य होत नाही आणि शक्य झाल्यास ते शरीरासाठी पौष्टीक नसतात. अनेक वेळा लहान मुलं चॉकलेट खाण्यासाठी हट्ट करतात.
advertisement
2/7
तर या सर्व बाबींवर एक उपाय म्हणजे पौष्टीक आणि टेस्टी असे ड्रायफ्रुटचे लाडू. हे लाडू बनवण्यासाठी वेगवेगळी पद्धत आहे. पण लहान मुलंही आवडीने खातील अशा पद्धतीने लाडू कसे बनवायचे? याबद्दलच रसिका शेळके यांनी रेसिपी सांगितली आहे.
advertisement
3/7
ड्रायफ्रूटचे लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य : तूप, काजू, बदाम, खोबरा किस, मनुका, खजूर आणि इतरही ड्रायफ्रूट तुम्ही घेऊ शकता.
advertisement
4/7
ड्रायफ्रूटचे लाडू बनवण्यासाठी कृती : सर्वात आधी सर्व ड्रायफ्रूट खजूर, खोबरा किस सोडून काजू, बदाम, मनुका हे तुपामध्ये तळून घ्यायचे आहे. छान भाजून घेतल्यानंतर मिक्सर मधून बारीक करून घ्यायचे आहे. बारीक करताना एकदम पीठ करायचं नाही. थोड जाडसर असे बारीक करून घ्यायचे आहे.
advertisement
5/7
सर्व बारीक केल्यानंतर खजूर आणि मनुका हा ओलसर होतो. त्यात सर्व मिश्रण करून एकजीव करून घ्यायचं. त्यात दूध, पाणी काहीही टाकायची गरज नाही. पाहिजे असल्यास तुम्ही तुपाचा थेंब घेऊन लाडू तयार करू शकता.
advertisement
6/7
खजूर आणि मनुकाचा गोडवा त्या लाडवात उतरतो. त्यामुळं साखर वगैरे घालायची गरज नाही. तुम्हाला पहिजे तसे लाडू तुम्ही बनवू शकता. या लाडूची चव काही वेगळीच लागते. ज्यांना आवडत नाही तेही अशा पद्धतीने बनवल्यास लाडू नक्की खाऊन बघतील.
advertisement
7/7
अगदी सोपी आणि कमीत कमी वेळात बनवता येईल अशी रेसिपी आहे. तुमच्या कडील लहान मुलांना सुद्धा चॉकलेट एवजी चॉकलेट आकाराचे तुम्ही हे लाडू बनवून देऊ शकता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
मुलं घरात नीट जेवत नाही? मग बनवा हा खास लाडू, सोपी रेसिपी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल