TRENDING:

झणझणीत मिसळ खावी तर कोल्हापूरचीच! 'जगात भारी' टॉप 5 मिसळ

Last Updated:
Kolhapur Misal: कोल्हापुरात झणझणीत मिसळ मिळणारी अनेक प्रसिद्ध ठिकाणे आहेत. यातील टॉप 5 मिसळबाबत जाणून घेऊया.
advertisement
1/7
झणझणीत मिसळ खावी तर कोल्हापूरचीच! 'जगात भारी' टॉप 5 मिसळ
कोल्हापूरची खाद्य संस्कृती देशात प्रसिद्ध आहे. तांबड्या-पांढऱ्या रश्शाप्रमाणेच मिसळसाठी देखील कोल्हापूर प्रसिद्ध आहे. कोल्हापुरात मिसळसाठी प्रसिद्ध असणारी अनेक ठिकाणे आहेत. यातील टॉप 5 मिसळबाबत जाणून घेऊया.
advertisement
2/7
ठोंबरे मिसळ : कोल्हापुरातील बिंदू चौक परिसरात भोई गल्लीतील ठोंबरे मिसळ प्रसिद्ध आहे. ही मिसळ सकाळी 9 ते 12 या वेळेत मिळते. 17 वर्षांपूर्वी चालू झालेल्या या मिसळीला कोल्हापूरकरांसह येणाऱ्या पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. इतकी प्रसिद्धी मिळून सुद्धा ही मिसळ अजूनही साध्या पद्धतीने एका छोट्या दुकान गाळ्यामध्ये चालू आहे. तरीही लोक इथं नंबर लावून मिसळ खात असतात, हीच या मिसळची खासियत आहे.
advertisement
3/7
शिव मिसळ : कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात अल्पावधीतच प्रसिद्धी मिळवलेल्या मिसळीपैकी शिव मिसळ ही एक आहे. या मिसळीचे वैशिष्ट्य म्हणजे मिसळमध्ये जवळपास सगळीकड फक्त उकडलेला बटाटा दिला जातो. मात्र, इथे बटाटा, मटकी, चटणीसह विविध घटक असलेली विशेष पद्धतीने बनवलेली भाजी वापरली जाते.
advertisement
4/7
लक्ष्मी मिसळ : कोल्हापुरातील उद्यम नगर परिसरात असणारी लक्ष्मी मिसळ प्रसिद्ध आहे. ही मिसळ खाण्यासाठी सेलिब्रिटीही हजेरी लावतात. या मिसळनं देशभरात आयोजित केलेल्या विविध खाद्य महोत्सवामध्ये कोल्हापूरचं नाव गाजवलंय. कोल्हापुरात सध्या मिसळीच्या नावाखाली सोलकढी, पापड, दही, खर्डा असे बरेच प्रकार दिले जातात. मात्र कमी वेळेतच जास्तीत जास्त प्रसिद्धी मिळवलेली ही मिसळ अगदी साध्या पद्धतीने दिली जाते.
advertisement
5/7
भगत मिसळ : कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी उद्यम नगर परिसरामध्ये ही मिसळ आहे. अत्यंत साध्या पद्धतीन एका छोट्या गाड्यावर ही मिसळ आहे. हीच या मिसळीची खासियत आहे. आठवड्यातून फक्त सोमवारी या मिसळीला सुट्टी असते. रमेश भगत यांनी ही मिसळ चालू केली आहे.
advertisement
6/7
दत्त मिसळ : कोल्हापुरातील दसरा चौक परिसरामध्ये असणारी ही मिसळ गेल्या 70 वर्षांपासून कोल्हापूरकरांची आवडती मिसळ ठरली आहे. मिसळ बनवण्यासाठी ते विशिष्ट प्रकारची शेव वापरतात. गेल्या 70 वर्षांपासून ही त्यांनी परंपरा जपली आहे. कोल्हापूरच्या सर्वात जुन्या मिसळींपैकी ही एक मिसळ आहे.
advertisement
7/7
दरम्यान, मिसळ हा तसा कोल्हापूरकरांचा आस्थेचा विषय आहे. खरं तर कोल्हापुरात मिसळ कुठली भारी? हे विचारलं तर प्रत्येक जण वेगवेगळ्या मिसळीकड बोट करणार. तुमची आवडती मिसळ या 5 मध्ये नसेल तर आम्हाला नक्की कळवा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
झणझणीत मिसळ खावी तर कोल्हापूरचीच! 'जगात भारी' टॉप 5 मिसळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल