खवय्यांसाठी पर्वणी! आता अमरावतीमध्ये खा कुल्हड पिझ्झा, चव जबरदस्त PHOTOS
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
पिझ्झा खायला अनेकांना आवडतो. त्यात जर कुल्हड पिझ्झा मिळत असेल तर पाहिलाच नको. अश्या ठिकाणी खवय्यांची मोठी गर्दी असते. अमरावतीमधील गाडगेनगर येथील चौपाटी परिसरात शेगाव नाका रोड येथे आयुष शावरे यांनी कुल्हड पिझ्झाचे नवीन स्टॉल सुरू केले आहे.
advertisement
1/7

पिझ्झा खायला अनेकांना आवडतो. त्यात जर कुल्हड पिझ्झा मिळत असेल तर पाहिलाच नको. अश्या ठिकाणी खवय्यांची मोठी गर्दी असते. अमरावतीमधील गाडगेनगर येथील चौपाटी परिसरात शेगाव नाका रोड येथे आयुष शावरे यांनी कुल्हड पिझ्झाचे नवीन स्टॉल सुरू केले आहे.
advertisement
2/7
जिथे तुम्हाला 59 रुपयांत कुल्हड पिझ्झा मिळेल. आयुष शावरे यांनी ही संकल्पना दिल्ली येथून आणलेली आहे. कुल्हड पिझ्झा रेसिपी सुद्धा त्यांनी दिल्ली येथेच शिकलेली आहे. त्यामुळे अमरावतीमधील खवय्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. दिल्लीतील कुल्हड पिझ्झा आता अमरावतीमध्ये मिळणार आहे.
advertisement
3/7
अमरावतीमधील गाडगे नगर परिसरात असलेलं कुल्हड पिझ्झाचे स्टॉल गेल्या 2 महिन्यापासून सुरू झालेले आहे. आयुष शावरे यांच्याशी लोकल 18 ने संवाद साधला तेव्हा ते सांगतात की, मी दिल्लीमध्ये कुल्हड पिझ्झा बघितला होता आणि तो मला युनिक वाटला. मग मी विचार केला आपल्या अमरावतीमध्ये नक्की चालेल, ट्राय करून बघुया.
advertisement
4/7
ही संकल्पना मला दिल्ली येथे सुचली, त्यामुळे मी तिथूनच कुल्हड पिझ्झा शिकून घेतला आणि गेले 2 महिने हा स्टॉल लावलाय. यातून मला बऱ्यापैकी उत्पन्न मिळत आहे.
advertisement
5/7
दिवसाला माझे 30 ते 40 पिझ्झा विकले जातात. अमरावतीमधील लोकांना कुल्हड पिझ्झाची टेस्ट आवडायला लागली आहे. मला चांगला रिस्पॉन्स मिळत आहे.
advertisement
6/7
पुढे ते सांगतात, या पिझ्झामध्ये आम्ही बेस पिझ्झामध्ये वापरतात तेच सर्व साहित्य वापरतो, फक्त पिझ्झा बेस वापरत नाही. त्याऐवजी आणि स्लाइस ब्रेड वापरतो. पिझ्झा बेस हा पचायला कठीण जातो, ब्रेड आपण डेली सुद्धा खाऊ शकतो, असा विचार करून आम्ही हा स्टॉल इथे सुरू केलाय. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या पॉलिथिन वापरल्या पेक्षा मातीच्या भांड्यातील अन्न हे केव्हाही बेस्ट आहे.
advertisement
7/7
त्यामुळे कुल्हड पिझ्झा ही संकल्पना मला खूप आवडली. त्याचबरोबर टेस्ट ही बेस पिझ्झा सारखीच येणार पण किंमत मात्र कमी आहे. 59 रुपयांत कुल्हड पिझ्झा आम्ही विकत आहोत. गाडगेनगर येथे तोटे नेत्रालयाच्या समोर कुल्हड पिझ्झाचे आमचे स्टॉल आहे, असे त्यांनी सांगितले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
खवय्यांसाठी पर्वणी! आता अमरावतीमध्ये खा कुल्हड पिझ्झा, चव जबरदस्त PHOTOS