TRENDING:

शाकाहाऱ्यांचं मटण, आरोग्यासाठी सर्वोत्तम पण जास्त खाल्ल्याने होतो त्रास! भाजी कोणती?

Last Updated:
डॉ. स्मिता श्रीवास्तव सांगतात की, कितीही पौष्टिक असले तरी उन्हाळ्यात 5 पदार्थ जास्त प्रमाणात खाऊ नये. कारण ते गरम असल्यामुळे त्रास होऊ शकतो. परंतु ते पूर्णपणे जेवणातून वगळू नये, नाहीतर आरोग्याला पुरेसे पौष्टिक तत्त्व मिळणार नाहीत. (सौरभ वर्मा, प्रतिनिधी / रायबरेली)
advertisement
1/6
शाकाहाऱ्यांचं मटण, आरोग्यासाठी सर्वोत्तम पण जास्त खाल्ल्याने होतो त्रास!
जवळपास प्रत्येक किचनमध्ये लसूण असतोच. जो आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो. परंतु उन्हाळ्यात लसून जास्त प्रमाणात खाऊ नये. नाहीतर अन्नपचनात अडथळे येतात, एसिडिटी होऊ शकते, छातीत जळजळ, त्वचा लाल पडणं, इत्यादी त्रास होऊ शकतो.
advertisement
2/6
हिरव्या पालेभाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्त्व असतात. परंतु उन्हाळ्यात त्या अतिप्रमाणात खाल्ल्यास नुकसान थेट किडनीचं होऊ शकतं. शिवाय गॅस, आतड्यांचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे हिरव्या पालेभाज्या आवर्जून खाव्या परंतु प्रमाणात.
advertisement
3/6
आलंसुद्धा आरोग्यासाठी प्रचंड फायदेशीर असतं. परंतु उन्हाळ्यात ते जास्त प्रमाणात खाल्ल्यास पचनसंस्था बिघडते. एसिडिटीसुद्धा होऊ शकते.
advertisement
4/6
सुरण ही भाजी म्हणजे शाकाहाऱ्यांचं मटण मानली जाते एवढी ती <a href="https://news18marathi.com/photogallery/lifestyle/health/from-stress-to-sperm-this-indian-spice-is-amazing-for-health-l18w-mhij-1177274.html">स्वादिष्ट</a> लागते. परंतु उन्हाळ्यात ती जास्त प्रमाणात खाल्ल्यास पचनसंस्था बिघडतेच शिवाय त्वचेचंही <a href="https://news18marathi.com/photogallery/lifestyle/health/how-much-sleep-is-enough-l18w-mhij-1177187.html">नुकसान</a> होतं.
advertisement
5/6
वांग जवळपास सर्वांनाच आवडतं. परंतु उन्हाळ्यात जास्त प्रमाणात वांग खाल्ल्याने पोटाचे प्रचंड हाल होतात. एसिडिटी वाढते, शिवाय बद्धकोष्ठताही होते.
advertisement
6/6
सूचना: इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी, आपण कोणत्याही <a href="https://news18marathi.com/photogallery/lifestyle/food/health-tips-what-to-mix-in-curd-sugar-or-salt-l18w-mhij-1177899.html">पदार्थाचं सेवन</a> करण्यापूर्वी स्वत: डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
शाकाहाऱ्यांचं मटण, आरोग्यासाठी सर्वोत्तम पण जास्त खाल्ल्याने होतो त्रास! भाजी कोणती?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल