10 हून अधिक प्रकारचे सलाड अन् सँडविच, डोंबिवलीत खाण्यासाठी बेस्ट ठिकाण
- Published by:Mohan Najan
- Reported by:Sakshi Sushil Patil
Last Updated:
या फूड कॉर्नरचे वैशिष्ट्य म्हणजे न्यूट्रिशियन फूड मिळते. ज्यामध्ये दहाहून अधिक प्रकारचे सलाड, स्प्राउट डिशेस, सँडविच सुद्धा मिळते. जिम करणारे अनेक जण हमखास इथं रोज येतात.
advertisement
1/7

लॉकडाऊन नंतर फिटनेसची काळजी घेणारे अनेक जण दिसून येत आहेत. या सगळ्यांसाठी डोंबिवलीमध्ये एक बेस्ट लोकेशन आहे. ते म्हणजे डोंबिवली स्थानकापासून फक्त 10 मिनिटांच्या अंतरावर असणारे न्यूट्रीस्ट्रीट किचन. या फूड कॉर्नरचे वैशिष्ट्य म्हणजे न्यूट्रिशियन फूड मिळते. ज्यामध्ये दहाहून अधिक प्रकारचे सलाड, स्प्राउट डिशेस, सँडविच सुद्धा मिळते. जिम करणारे अनेक जण हमखास इथं रोज येतात.
advertisement
2/7
आर्या बेंद्रे या मराठी महिलेने लॉकडाऊनच्या नंतर या व्यवसायाला सुरुवात केली. बाहेरचे खाणं अनेकांना आवडतं पण त्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे आर्या यांनी नवीन युक्ती शोधली आणि स्वतःचे न्यूट्री स्ट्रीट किचन सुरू केले.
advertisement
3/7
या न्यूट्रीस्ट्रीट किचन मधून त्या बाहेर मिळणारे सगळे पदार्थ पौष्टिक पद्धतीने बनवून विकू लागल्या. ऑटोमोबाईल्स या क्षेत्रातील ज्ञान असणाऱ्या आणि त्याच क्षेत्रात पूर्वी काम करणाऱ्या आर्या यांना कायमच नवीन काहीतरी करायचे होतं आणि म्हणूनच त्यांनी या व्यवसायाची सुरुवात केली.
advertisement
4/7
या न्यूट्रीस्ट्रीट किचनमध्ये तुम्हाला ज्युसेसमध्ये सफरचंद, अननस, पपई आणि यासोबतच डेटॉक्स, इम्युनिटी, स्ट्रेस बस्टर असे ज्युसेस अव्हलेबल आहेत. यांच्या इथं मिळणारे डेटॉक्स खूप प्रसिद्ध आहे. यामध्ये तुम्हाला एप्पल, पालक, कोथिंबीर, कुकुंबर आणि लेमन अशा सगळ्यांचे मिश्रण मिळेल.
advertisement
5/7
सँडविचमध्ये सुद्धा दहाहून अधिक प्रकार मिळतील ज्यामध्ये व्हेज ग्रील, आलू सँडविच, चीज ग्रील सँडविच, व्हेज पनीर ग्रील, व्हेज पनीर चीज ग्रील असे पदार्थ उपलब्ध आहेत. या सँडविचमध्ये वापरल्या जाणाऱ्या सगळ्या भाज्या अगदी फ्रेश वापरल्या जातात. इथे मिळणारे पालक रॅप आणि बीट रूट रॅप तर कमाल लागतं.
advertisement
6/7
जिमला जाणाऱ्यांसाठी इथं एक विशेष डिश आहे. ते म्हणजे मटकी भेल आणि स्प्राउट भेल. या भेलमध्ये सगळ्या प्रकारचे कडधान्य असतात. त्यामुळे ही चटपटीत आणि पौष्टिक भेल इथं येणारे सगळे लोक आवर्जून घेतात.
advertisement
7/7
'मला कायमच काहीतरी वेगळा व्यवसाय करायचे होते. अशातच लॉकडाऊन नंतर अनेक जण स्वतःच्या फिटनेसची काळजी घेताना दिसून यायला लागले. म्हणूनच मी जिथे पौष्टिक आहार मिळेल असे हे न्यूट्रीस्ट्रीट किचन सुरू केले' असे व्यावसायिक आर्या बेंद्रे यांनी सांगितले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
10 हून अधिक प्रकारचे सलाड अन् सँडविच, डोंबिवलीत खाण्यासाठी बेस्ट ठिकाण